Friday, March 6, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

दिव्यांग व्यक्ती घरकुलापासून वंचित राहणार नाही यासाठी काम करा बच्चू कडू अभियान अध्यक्षांकडून दिव्यांग कल्याणाचा आढावा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 16, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
दिव्यांग व्यक्ती घरकुलापासून वंचित राहणार नाही यासाठी काम करा बच्चू कडू अभियान अध्यक्षांकडून दिव्यांग कल्याणाचा आढावा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

🖊️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो . 9284981757

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन वर्धा, दि. 13:- दिव्यांगांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. परंतू त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. कालमर्यादेत त्यांच्यापर्यंत योजना व राबविण्यात येणारे उपक्रम कसे पोहोचतील यासाठी प्रयत्न करा. घरकुलासाठी दिव्यांग लाभार्थ्यांना प्राधान्य दिले जाते. परंतू अद्यापही अनेक दिव्यांगांना घरे मिळाले नाही. जिल्ह्यातील एकही दिव्यांग व्यक्ती घरकुलापासून वंचित राहणार नाही, यासाठी काम करा, असे निर्देश दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विविध विभाग व महामंडळांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणी बाबत श्री. कडू यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी वर्धा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खताळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

अद्याप दिव्यांगांच्या प्राथमिक गरज देखील पुर्ण झालेल्या नाही. जिल्ह्यातील दिव्यांगांना त्यांच्या साठी राबविण्यात येत असलेल्या योजना, उपक्रमांचा लाभ मिळवून देण्यासाठी कालमर्यादा निश्चित करा. दिव्यांगांसाठी राखीव 5 टक्के निधी खर्च होईल याची जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यांवर सोपवा. दिव्यांगांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक सहाय्याचा विषय तहसिलदार, अंत्योदय योजनेचा लाभ मिळवून देण्याची जबाबदारी पुरवठा निरिक्षक तर वैश्विक ओळखपत्र, विविध प्रमाणपत्र त्यांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांवर सोपवा. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांना शक्ती केंद्र करा, असे श्री.कडू यांनी सांगितले.

दिव्यांगांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवून शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न केले जावे. दिव्यांग जन्मालाच येऊ नये. जन्माला आलेल्या दिव्यांग बालकांवर वेळीच उपचार करून त्याचे दिव्यांगत्व नाहीसे करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले जावे. दिव्यांगांना कृत्रिम अंगांचे वितरण केले जातात, हे अंग उत्तम दर्जाचे असावे.

दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, उपक्रमांची ग्रामस्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेतले जावे. सर्वसाधारण लाभार्थ्यांसह दिव्यांगांना घरकुलाचा प्राधान्याने लाभ दिला जातो. अनेक दिव्यांगांना घरे मिळाली नाही. घरकुलासाठी शासनाचे अनुदान कमी आहे. या अनुदानात घर बांधणे शक्य नाही. जिल्ह्यात घरकुलाचे उद्दिष्ठ वाढविण्यासोबतच अनुदानाच्या वाढीसाठी शासनास प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश श्री.कडू यांनी दिले.

वर्धा हा राष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांचा जिल्हा आहे. गांधीजींनी या जिल्ह्यात मोठे काम केले आहे. जिल्ह्यातील शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी देखील दिव्यांगांसाठी चांगले काम करावे, अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली. दिव्यांगांसाठी येत्या काळात जिल्ह्यात चांगले काम होईल. दिव्यांगांसाठी असलेल्या योजना, उपक्रमांचा वेळोवेळी आढावा घेऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करू असे यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले.

Previous Post

समता समाज बौध्द मंडळ रामपूर व भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा रामपूरच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त प्रबोधनचा कार्यक्रम संपन्न.

Next Post

मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या वाढदिवस निमित्त अहेरी नगरीत पहिल्यांदाच हास्यकल्लोळ व नृत्यांचा नजराणा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या वाढदिवस निमित्त अहेरी नगरीत पहिल्यांदाच हास्यकल्लोळ व नृत्यांचा नजराणा.

मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या वाढदिवस निमित्त अहेरी नगरीत पहिल्यांदाच हास्यकल्लोळ व नृत्यांचा नजराणा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In