हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर दिनांक 14:- रोज शनीवार ला रामपूर येथील विहारांतील पदाधिकाऱ्यांना धम्म बांधव भगिनीं येथील नागरिक एकत्र येऊन या कार्यक्रमाच्या सुरुवातिला मुरलीधर ताकसांडे यांचा हस्ते पंचशील ध्वजचे ध्वजारोहण झाले यानंतर प्रथम तथागत गौतम बुध्द आणि बोधिसत्व, महामानव, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अगरबती, मेणबत्ती दीप प्रजलीत करून सामूहिक त्रीशरण पंचशील घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवराचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी अशोक दुबे अध्यक्ष यांनी सुंदर गीत गाऊन कार्यक्रमाची प्रस्ताविक केले. बाबासाहेबाची धम्म क्रांती या विषयावर कैविसताई मेश्राम केंद्रीय शिक्षिका चंद्रपूर यांनी अगदी दीड तास सविस्तर पने समाज प्रबोधन केले नतर प्रा.सोमजी गोंडाने जिलाध्यक्ष, मुरलीधर ताकसांडे अध्यक्ष यांचे वरील विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये अशोक दुधे ग्राम अध्यक्ष, धर्मुजी नगराळे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभा तालुका राजुरा, लताताई डखरे,सदस्य रामपूर, हेमलता ताकसाडे, माजी उपसरपंच होते आणि सेवानिवृत्त मध्ये मुरलीधर ताकसांडे, देविदास कांबळे, सुनील सुर्यवंशी, शोभा मेश्राम यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन अरविंद तामगाडगे उपाध्यक्ष आणि आभार प्रदर्शन शरद खरतड सर नी केले. या कार्यक्रमाला रामपूर शहरातून बौद्ध बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली होती.

