सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सोलापूर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. सोलापूर जिल्हाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. चंद्रकांत पाटील हे सोलापूर जिल्हाच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळी भीम आर्मीच्या कार्यकर्त्याने शाई फेकून चंद्रकांत पाटील यांना विरोध केला. कंत्राटीकरणाचा विरोध करत काळे झेंडे दाखवले.
मागील काही दिवसांपासून स्थानिक पालकमंत्री हवा म्हणून चंद्रकांत पाटलांना सोलापुरातून जोरदार विरोध सुरू होता. त्यामुळे पोलीसानी मोठा बंदोबस्त लावला होता. तरी देखील भीम आर्मीच्या अजय मैनदर्गीकर याने शाई फेकली. यावेळी चंद्रकांत पाटलांचा पांढऱ्या शर्टवर शाई फेकल्याने यावेळी मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता. पोलिसांनी ताबडतोब भीम आर्मीच्या कार्यकर्त्या अजय मैनदर्गीकर यास ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्या हातात काळे झेंडे होते.
धनगर कृती समितीचे शेखर बंगाळे हे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन देण्यासाठी रविवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृह येथे आले होते. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी सोलापूर पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने स्वतः तळ ठोकून बसले होते.पोलिसांचा मोठा फौजफाटा शासकीय विश्रामगृह येथे येणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी व झाडाझडती करत होता.धनगर कृती समितीचे शेखर बंगाळे यांनी तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांवर निवेदन देण्याचा बहाणा करून भंडारा उधळला होता.

