लोकसभा निवडणूकिचा तयारीवर लागण्याचे केले आव्हान.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिरोंचा:- तालुक्यातील रेंगुटा,मोयाबीनपटा,झिंगानूर अंकिसा, सोमनपल्ली नगरम या भागात माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी कांग्रेस कार्यकर्त्यांना भेट दिली आणि या भागातील समस्या जाणून घेतल्या व येणाऱ्या लोकसभा निवडणूकसाठी तयारीवर लागण्याची निर्देशही दिले.
राज्यात व केंद्रात सत्ता असताना गडचिरोली जिल्ह्यात खासदार, आमदार असतांना सुद्दा माघील 9 वर्षात भाजपा सरकारन या भागात कोणतीही विकास कामे केले नसून या भागात नवीन रस्ते बनले नाही,वीज समस्या आहे,आरोग्य सेवा बरोबर नाही असे अनेक विविध समस्या नागरिकांना दैनीय अवस्था सहन करावा लागत आहे. गेल्या काही महिन्यांपासून या भागात डेंगू, मलेरियाचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांचा मनात दहशतीचा वातावरण आहे, तरी राज्य शासन यावर कोणतीही उपयोजना करत नसून सत्ताधारी दुर्लक्ष करत असल्याने भाजपा प्रति उद्रेकचे वातावरण आहे. येत्या लोकसभा निवडणूकित भाजपा ला आपली जागा दाखवणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली आहे.
या बैठकीत उपस्थित – आमदार डॉ.नामदेवराव उसेंडी साहेब, तालुका कांग्रेस कमिटी अध्यक्ष सतीश जवाजी, शहर अध्यक्ष सलाम सय्यद, जेष्ठ नेते रयल्ला पपया, कोमेरा वेंकन्ना, अहेमद अली, मंचरला शंकर, युवा कांग्रेस नेते माजिद अली, दीपक बेज्जनीवार, युवा कांग्रेस चे जिल्हा सचिव श्रीमती. नवशद हैदार शेख व शरद पवार गट चे तालुका अध्यक्ष फाझील पाशा, उपाध्यक्ष सागर मुलकाला व सलमान शेख व इतर कार्यकर्ते मोट्या संकेत उपस्थित होते.

