मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज !ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट येथे अग्रेसर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्याने हिंगणघाट शहरातील प्रमुख मार्गावर भव्य शोभायात्रे चेआयोजन करण्यात आले. स्थानिक कारंजा चौकात नारायण सेवा मित्र परिवार चे वतीने थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. अग्रवाल परिवाराचे वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. त्याचप्रमाणे गुजराती समाजाच्यावतीने चहाचे वितरण करण्यात आले. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी माजी आमदार राजू तिमांडे,पराग मुड़े, विपिन खिंवासरा, महेश अग्रवाल, मनोज सिंघवी, सुभाष लालवानी, एड. विशाल जैन, प्रा. किरण वैद्य, राजेश कासवा,अशोक सिंघवी, बृजमोहन करवा, रूपचंद हेमनानी, महेश दीक्षित, रामदास खडगी, अरुण पंडित, लक्ष्मण डहाके, लक्ष्मीकांत मेढे, बंडू घिये, चंदनखेड़े, अमोल भूतड़ा, चंद्रकांत रोहनकर, हरीश गुप्ता,अमोल भूतड़ा, राजू कासवा, व मित्र परिवार चे सर्व सदस्य सहभागी होते.

