आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मोबाईल. 8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हा तीन एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील एक विवाहितेला बिहार. राज्यात विकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हात खळबळ माजली आहे. बेपत्ता झालेली ही विवाहित महिला तब्बल दोन महिन्यांनी आपल्या घरी सुखरूप पोहोचली आहे. ही घटना फेसबुकमुळे घडली व फेसबुकनेच उजेडात आली आहे.
वर्धा जिल्ह्यातील येळाकेळी येथील एका विवाहितेस एका अज्ञात व्यक्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून जवळीक साधून तिला फूस लावून पळवून नेले होते. तशी तक्रार तिच्या पतीने 15 ऑगस्ट रोजी सेलू पोलिसांकडे केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी शोध घेण्यात सुरुवात केली. पण तपास करूनही या विवाहितेचा शोध लागत नव्हता.
त्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलीकरत चौहू दिशेने तपास सुरू केला. सदर महिलेने घरून जाण्यापूर्वी फेसबुक मेसेंजरवर एक संदेश टाकला होता. त्यावरून तपासाची दिशा ठरविण्यात आली. तो सायबर पोलिसांच्या मदतीने पत्ता मिळवत त्याआधारे पोलीस निरीक्षक धनंजय पांडे तसेच अखिलेश गव्हाणे, सचिन वाटखेडे, रुखसाना शेख यांचे पथक बिहारला रवाना झाले. महिला ही वैशाली जिल्ह्यातील पिरापूर मथुरा या गावात असल्याचे तांत्रिक बाबीने दिसून आले.
हे गाव अतिदुर्गम भागात तसेच संवेदनशील असल्याने मोठे आव्हान होते. मात्र पोलिसांनी विविध संकटे दूर करीत महिलेस ताब्यात घेतले. तिला आता तिच्या कुटुंबाच्या हवाली करण्यात आले आहे. हे गाव नेपाळ सीमेपासून जवळच आहे. या महिलेस नेपाळमध्ये विकण्याचा डाव होता, अशी माहिती पुढे आली आहे.

