मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्ह्यातील चामोर्शी पंचायत समिती च्या वतीने शिवाजी हायस्कुल ते पंचायत समिती पर्यंत कलश यात्रा संपन्न करण्यात आले. या कलश यात्रेचे उद्धाटन गडचिरोली विधान सभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी याचे झाले.
शिवाजी हायस्कुल येथे तालुक्यातील सर्व ग्राम पंचायतीचे कलश एकत्रित करण्यात आले. त्यानंतर सर्व कलश डोक्यावर घेऊन पंचायत समिती पर्यंत यात्रा काढण्यात आली. त्यानंतर ग्राम पंचायतीने आणलेल्या कलशातील माती पंचायत समितीच्या कलशात आमदार डॉ. देवराव होळी यांचे हस्ते एकत्रित करण्यात आली.
यावेळी बोलताना आमदार डॉ. देवराव होळी म्हणाले, की स्वातंत्र्याच्या 75 वर्षा निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व गावातून माती घेऊन अमृत वाटिका तयार करण्याचा संकल्प केला आहे. त्याकरिता सदर माती दिल्लीला पोहोचवायची आहे.

या कार्यक्रमाला आमदार डॉ. देवराव होळी, प.स. चामोर्शीचे गट विकास अधिकारी एस. बी. पाटील, सहाय्यक गट विकास अधिकारी बी. बी. व्हनखंडे, भाजपा तालुका अध्यक्ष प्रमोद चलाख, भाजपा बंगाली आघाडी सुरेश शहा, तसेच प. स. चे सर्व अधिकारी कर्मचारी, शिवाजी व बोमनवार शाळेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

