उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार संघ सांगली यांचे विद्यमाने श्रावस्ती विहार येथे 67 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 67 वा धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त धम्मरॅलीने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली यावेळी परिसरातील शेकडो नागरिक या धम्मरॅलीत सहभागी झाले होते.
यावेळी आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांचे हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग विटा येथील कार्यकारी अभियंता इंजि. संतोष तायडे व सामाजिक कार्यकर्त्या उषा विरभक्त यांचे व्याख्यान तसेच डाॅ.ॠतिका हणमंत साबळे, आदर्श शिक्षिका अवंतिका वाघमारे, इंजि. पी. एम. कांबळे यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमास माजी नगरसेवक मनगू सरगर, अध्यक्ष डाॅ.सुधीर कोलप, उपाध्यक्षा सुनिताताई धम्मकिर्ती, सचिव पवन वाघमारे, भारत कदम, संभाजी माने, चंद्रकांत चौधरी, जगन्नाथ आठवले, उषाताई कांबळे, शैलजाताई साबळे, दीपमाला कांबळे यांच्यासह धम्म बांधव उपस्थितीत होते.

