पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626
गुन्हे शाखा युनिट ४ पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- आज रोजी युनिट 04 चे पथक खडकी पोलीस ठाणे चे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अजय गायकवाड व पोलीस अंमलदार अमोल वाडकर यांना त्यांचे बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, तीन महिन्यापूर्वी दरोड्याची तयारी या गुन्ह्यातील परागंदा झालेला आरोपी तरुण पिल्ले हा खडकी बाजार अम्यूनेशन फॅक्टरी रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ थांबलेला आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने युनिट 04 कडील पथकाने सदर ठिकाणी जाऊन आरोपीस ताब्यात घेतले. त्यास त्याचं नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव तरुण सुरेश पिल्ले, वय 23 वर्षे, रा. नाजरत गणपती मंदिराजवळ, खडकी बाजार, पुणे असे असल्याचे सांगितले. त्याच्याकडे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करता त्याने सदर गुन्हा हा तीन महिन्यापूर्वी खडकी रेल्वे स्टेशन कडे रेल्वे पोलीस हेडक्वार्टर बाहेरील रोडवर निहाल गवळी, आदित्य पटेकर, अनिकेत ननावरे, पापा कुरेशी, यश सोकटे, निन्या पवार, अरबाज शेख, अमन जाधव यांचे सोबत केला असल्याचे सांगितले. खडकी पोलीस ठाणे यांचेकडून अधिक माहिती घेतली असता सदर बाबत खडकी पोलीस ठाणे येथे गु.र. नं. 272/2023 भा.द.वि. कलम 399, 401, 402 भारतीय हत्यार कायदा कलम 4 /25 महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1)( 3) सह 135 अन्वये दाखल असून गुन्ह्यामध्ये आरोपी तरुण पिल्ले हा पाहिजे असले बाबत माहिती मिळाली.
सदर आरोपींस दाखल गुन्ह्याचे पुढील कारवाईकांमी वैद्यकीय तपासणी करून खडकी पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

