पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626
चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि. १५/०९/२०२३ रोजी फिर्यादी हे रात्री त्यांचे मित्रासोबत एसएसपीजी लेन नं. ०२. सैनिकवाडी, खराडकर नगर शेजारी वडगाव शेरी, पुणे येथुन पायी जात असताना मोटार सायकलवरुन आलेल्या तीन इसमापैकी सर्वात मागे बसलेल्या इसमाने फिर्यादी याचे हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसका मारुन नेला म्हणुन फिर्यादी यांनी चंदननगर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून गु.र.नं. ४३१/ २०२३, भा.दं.वि. कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला होता.
दाखल गुन्ह्याचा तपास करीत असताना सदर गुन्ह्यामध्ये १) राहुल मुकेश सिंग, वय १९ वर्षे, रा. सणसवाडी पुणे मुळगांव-एकमा गांव पलपुरागाव, छपरा, जि. पाटणा, राज्य बिहार ( टोळी प्रमुख) २) प्रसाद संतोष भोंडवे, वय १८ वर्षे, रा. खराडी रोड, चंदननगर, पुणे ३) राज राहुल नगराळे, वय १९ वर्षे, रा. गलांडेनगर, जुना मुंढवा रोड, पुणे मुळगांव जामनकर नगर, यवतमाळ यांना अटक करण्यात आले आहे.
सदर आरोपीचे पूर्व रेकॉर्डची पाहणी करता आरोपी राहुल मुकेश सिंग (टोळी प्रमुख) यांने त्याचे साथीदारासह संघटीत गुन्हेगारी टोळी तयार केली असुन सदर टोळीने मागील १० वर्षात जबरी चोरी करणे, घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापुर्वक दुखापत पोचवणे चोरी करणे इत्यादी प्रकारचे गुन्हे केल्याचे निदर्शनास आले आहे. सदरचे गुन्हे हे अवैध मार्गाने स्वतःसाठी व इतरांसाठी गैरवाजवी आर्थिक फायदा व इतर फायदा मिळविण्यासाठी टोळीचे वर्चस्व व दहशत कायम ठेवण्यासाठी तसेच नागरीकांच्या मनात भिती निर्माण करण्यासाठी सातत्याने चालु ठेवल्याचे निष्पन्न होत आहे. यातील नमुद आरोपी यांनी संघटितपणे दहशतीचे मार्गाने स्वतःचे आर्थिक फायदयासाठी प्रस्तुत गुन्हा केल्याचे दिसुन आल्याने व गातील नमुद सदस्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केलेले आहेत.
दाखल गुन्हयास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ ते ३ (१) (ii). ३(२), ३(४) या कलमाचा अंतर्भाव करणेकामी चंदननगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र लांडगे यांनी मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ-४, पुणे, श्री. शशिकांत बोराटे, मा. सहा पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे श्री. संजय पाटील यांच्या मार्फतीने मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे श्री. रंजनकुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केला होता.
सदर प्रकरणाची छाननी करुन चंदननगर पोलीस स्टेशन गु.र.नं.४३१/२०२३.भा.दं.वि. कलम ३९२.३४ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयांमध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे ३(१) (ii). ३ (२), ३(४) या कलमाचा अंतर्भाव करण्याची विभाग पुणे मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक श्री रंजनकुमार शर्मा यांनी मान्यता दिलेली आहे.
सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहर श्री संजय पाटील हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त पुणे शहर श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे श्री. रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ – ४ श्री. शशिकांत बोराटे, मा. सहा. पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे श्री संजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली चंदननगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे). श्रीमती मनिषा पाटील, सहा. पोलीस निरीक्षक, प्रशांत माने, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, पोलीस अंमलदार, राजेश नवले, रामचंद्र गुरव, नाना पतुरे, गणेश आव्हाळे, अनुप सांगळे, पुजा डहाळे, यांनी केली आहे.
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री रितेश कुमार यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार स्वीकारल्या नंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारीक लक्ष देवुन शरीराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व समाजामध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अमलदार यांना निर्देश दिले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली सन २०२३ या चालु वर्षातील एकुण ७५ वी कारवाई आहे. पर्यंत एकूण ५२० आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.

