मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. किसान जिन गंगा माता मदीर जवळ एका कुख्यात गुन्हेगाराच्या हत्याने संपूर्ण हिंगणघाट शहर हादरले आहे. गजानन खंगार उर्फ़ गज्या हांडी असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. हिंगणघाट शहरात दिवसा ढवळ्या झालेल्या या हत्येने शास्त्री वॉर्ड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हत्या करण्यात आलेल्या इसम गजानन खंगार उर्फ़ गज्या हांडी हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याच्यावर हिंगणघाट पोलीस स्टेशन मध्ये अवैध दारू विक्री, मारामारी, दहशत माजवणे सह विविध गुन्हे दाखल होते. त्याला पोलिसांनी काही दिवस तडीपार पण केलं होत. गजानन खंगार उर्फ़ गज्या हांडी याची शास्त्री वॉर्ड परिसरात मोठी दहशत होती.
गज्या हांडी याची धारधार शस्त्राने डोक्यावर वार करून हत्या केल्या नंतर आरोपी घटना स्थळवरून पसार झाले. यावेळी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्त पसरलेले होत. त्याची माहिती स्थानिक हिंगणघाट पोलीस स्टेशनला माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आपल्या ताप्यासह घटनास्थळी दाखल झाले आणि मृतक गज्या हांडी याला स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात हिंगणघाट येथे पाठवले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर सपासप वार केले. यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले. मात्र गजु हंडी याची हत्या नेमकी कोणत्या कारणावरुन करण्यात हे अनभिज्ञ आहे. याप्रकरणी हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून आरोपींचाही शोध घेत आहेत. दिवसाढवळ्या झालेल्या हत्येमुळे शहरात पुन्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/ 7385445348

