Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी वर्धा जिल्हात 520 ग्राम पंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा व शिबिर.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 7, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी वर्धा जिल्हात 520 ग्राम पंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा व शिबिर.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मतदार यादी वाचन विशेष ग्रामसभेस जिल्हाधिकाऱ्यांचा सहभाग. विशेष शिबिरात 3 हजार 595 अर्ज दाखल, दि.25 व 26 नोव्हेंबरला पुन्हा विशेष शिबिर

प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबाईल :- 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.7:- नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदणी करुन आगामी काळात होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाच्यावतीने विशेष शिबिर घेतले जात आहे. या शिबिराच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून मतदार नोंदणी वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यात विशेष ग्रामसभांचे देखील आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी एका गावात या सभेला उपस्थित राहून मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहन दिले.

मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षन कार्यक्रम जिल्हाभर राबविण्यात येत आहे. त्यासाठी मतदार प्रारुप यादी प्रसिध्द करण्यात आली असून या प्रारुप मतदार यादीतील आवश्यक दुरुस्ती व नवमतदार नोंदणी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व 520 ग्रामपंचायतींमध्ये दिनांक 1 ते 7 नोव्हेंबर या कालावधीत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. ग्रामसभेमध्ये नागरिकांच्या माहितीसाठी प्रारुप मतदार यादीचे वाचन करण्यात आले. वर्धा तालुक्यातील सिंदी (मेघे) येथील विशेष ग्रामसभेस जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्वत: उपस्थित राहून सहभाग नोंदविला.

जिल्हाभर दिनांक 4 व 5 नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रस्तरावर विशेष शिबिर घेण्यात आले. या शिबिरांमध्ये आर्वी विधानसभा मतदारसंघात 649, देवळी विधानसभा मतदारसंघातील 724, हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातील 911 तर वर्धा विधानसभा मतदारसंघातील 950 नागरिकांनी मतदार नोंदणी, दुरुस्ती, नाव व पत्ता बदल, वगळणी आधार जोडणीसाठी विविध नमुने भरून अर्ज सादर केले. जिल्हाभर झालेल्या या विशेष ग्रामसभेस नवमतदारांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढील टप्प्यात दिनांक 25 व 26 नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रस्तरावर विशेष शिबिर घेण्यात येणार आहे. या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदार यादीसह उपस्थित राहणार आहे. मतदारांनी आपल्या नावाच्या नोंदणीसह नावे तपासणे, वगळणे, दुरुस्ती करणे, आधार जोडणी साठी केंद्रावर उपस्थित रहावे. मतदार याद्या अधिक अद्यावत करण्यासोबतच जास्तीत जास्त मतदार नोंदणी करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

Previous Post

वर्धा मतदारसंघात स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत मतदान नोंदणी जनजागृती.

Next Post

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षातेमुळे आजही सिरोंचा – आसरअल्ली राष्ट्रीय महामार्ग 63 अपघात सुरूच.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षातेमुळे आजही सिरोंचा – आसरअल्ली राष्ट्रीय महामार्ग 63 अपघात सुरूच.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षातेमुळे आजही सिरोंचा - आसरअल्ली राष्ट्रीय महामार्ग 63 अपघात सुरूच.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In