पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626
कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- कोंढवा पोलीस ठाणे पुणे शहर गुरन.८९६ / २०२३ भादवि कलम ३०२, ३६३, ३२६, १४३, १४७, १४८, १४९, महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३(२), ३(४) प्रमाणे गुन्हा दाखल आहेत. सदर गुन्हयात यापुर्वी अटक आरोपी व पाहिजे आरोपी यांनी दोन मुलाचे वर्चस्वाच्या वादातून अपहरण करून त्यांना डांबुन ठेवुन त्याच्या पैकी एकाला जबर मारहाण करुन खुन केला होता. तसेच दुसऱ्या मुलाला गंभीर जखमी करुन रोडवर फेकुन दिले होते. त्याबाबत वरिप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्हयात आरोपी नामे राजेंद्र उर्फ राजु ठोबरे व आमिन उर्फ घाऱ्या कांरजे हे गुन्हा केल्यापासुन फरारी होते. सदर आरोपी याचा तपास पथकातील अधिकारी लेखाजी शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक दिनेश पाटील, सहा पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार पो. हवा. २८३ अमोल हिरवे, पो हवा राहुल बंजारी, पो.शि.८२९८ अभिजीत रत्नपारखी पो.शि. १०११४ सुहास मोरे, पो.शि. ९१२६ विकास मरगळे, पो.शि. ८६४६ जयदेव भोसले, पो.शि. १००२६ राहुल थोरात, पो.शि. शंशाक खाडे, पो शि आशिष गरुड, पो शि रोहित पाटील, असे गुप्त बातमीदाराच्या मदतीने शोध घेत होतो. वरिल आरोपी पैकी आरोपी राजेंद्र उर्फ राजु ठोबरे, वय २१ वर्षे, रा. शिवनेरीनगर, कोंढवा खुा पुणे हा आशिर्वाद चौकात वेश बदलून दि. ०२/११/२०२३ रोजी सकाळी ०८.०० वा सुमारास येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार राहुल थोरात, जयदेव भोसले, विकास मरगळे यांना त्याच्या खास बातमीदाराकडुन प्राप्त झाली होती. सदर माहितीच्या अनुषंगाने आशिर्वाद चौकात थांबला असता आरोपी राजेंद्र उर्फ राजु ढोबरे हा तोडावर माकड टोपी व अंगात जर्किंग घालुन आशिर्वाद चौकात याठिकाणी आला असताना त्याला पोलीसांची चाहुल लागल्याने तो पळु जावु लागला त्याचा सिने स्टाईल पाठलाग करुन त्यास ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपी हा आमिन उर्फ धान्य हुसेन कांरजे, वय २२ वर्षे, रा. लक्ष्मीनगर, ग.न. ०२. कोंढवा बुआ पुणे हा चंदनगर याठिकाणी लपुन राहत असुन तो दि.०३/११/२०२३ रोजी खड़ी मशीन चौक याठिकाणी ओळख लपवुन तोडावर मास्क व टोपी घालुन येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार शंशाक खाडे, अमोल हिरवे, सुहास मोरे यांना त्याच्या खास बातमीदाराकडुन प्राप्त झाली होती. सदर माहितीच्या अनुषंगाने त्यास खड़ी मशीन याठिकाणी दि. ०३/११/२०२३रोजी पकडण्या करिता गेलो असता त्याला पोलीसांची चाहुल लागल्याने तो रस्त्याने जाणाऱ्या टेम्पोला लटकुन पळुन जावु लागला असता त्याचा सिने स्टाईल पाठलाग करुन त्यास ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे.
नमुद दाखल गुन्हयाचा पुढील तपास शाहुराव साळवे, सहा. पोलीस आयुक्त हे करित आहेत.
सदर कामगिरी ही मा. रितेशकुमार सो पोलीस आयुक्त, मा. संदिप कर्णिक सो, सह पोलीस आयुक्त, मा.रंजन शर्मा सो, अपर पोलीस आयुक्त, पुर्वे प्रादेशिक विभाग, मा. विक्रांत देखमुख, पोलीस उप आयुक्त सो परि.०५.मा.शाहुराव साळवे, सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग, संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संदिप भोसले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) व संजय मोगले पोलीस निरीक्षक (गुन्हे), यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे करण्यात आली आहे.

