Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

चक्क दिवाळीच्या दिवशीच नराधम पतीने केली आपल्याच पत्नीची निर्घृण हत्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 13, 2023
in क्राईम, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
चक्क दिवाळीच्या दिवशीच नराधम पतीने केली आपल्याच पत्नीची निर्घृण हत्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन छत्रपती संभाजीनगर:- जिल्हातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. देशात सर्वत्र दिवाळी उत्साह सुरू असताना दिवाळीचा दिवशी एका नराधम पतीने आपल्या पत्नीची गळा आवळून खून केल्याची घटना वैजापूर तालुक्यातील कापूसवडगाव येथून समोर आली आहे. भारती संतोष थोरात असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

या खून प्रकरणी नराधम पतीसह सासू-सासू विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष दिनकर थोरात वय 36 वर्ष, दिनकर माणिकराव थोरात वय 60 वर्ष, रंजना दिनकर थोरात वय 50 वर्ष असे आरोपींची नावे आहेत.

मृतक महिला भारती संतोष थोरात यांचा भाऊ ज्ञानेश्वर भगवान कदम यांनी वैजापूर पोलिसांत दिलेल्या तक्रारी नुसार, खून करण्यात आलेल्या भारतीचे 12 वर्षापुर्वी कापुसवाडगाव येथील संतोष दिनकर थोरात सोबत लग्न झाले होते. तसेच लग्नाच्या वेळी भारतीच्या वडीलांनी 1.50 लाख रुपये हुंडा व अंगावर दागदागिने दिलेले होते. सोबतच, संसारपयोगी सर्व वस्तु दिल्या होत्या. भारती सासरी नांदण्यास आल्यानंतर तिला सुरुवातीचे सहा महिने चांगली वागणूक देण्यात आली. मात्र, काही दिवसांनी पती व सासरचे लोक संगनमत करुन वेगवेगळ्या कारणावरुन भांडण करू लगले. तसेच, नेहमी तुझ्या बापाने आम्हाला काही दिले नाही. तु तुझ्या माहेराहून पैसे घेवुन ये अशी मागणी करु लागले. भारती यांनी याबाबत आई-वडीलांना सांगितले. त्यामुळे, भारती यांच्या आई वडिलांनी तिच्या सासरच्या लोकांना समजावुन सांगितले की, लग्नाच्या वेळी भरपुर खर्च झाला आहे. आम्ही तुम्हाला लग्नावेळी आमच्या आयपतीप्रमाणे मानपान केलेला आहे. आता आमच्याकडे पैसे नाही. आम्ही तुम्हाला पैसे देवु शकत नाही.’

भारती यांच्या आई-वडिलांनी समजावून सांगून देखील सासरचे लोक छोट्या छोट्या कारणावरुन त्यांना मानसिक व शारीरीक त्रास देत होते. तसेच, सुमारे पाच महिन्यांपुर्वी भारती खुप आजारी असल्याचे तिने भावाला फोन करुन सांगितले. त्यावेळी तिच्या सासरचे तिला दवाखान्यात घेवुन गेले नव्हते. तसेच, तिला सतत शिवीगाळ करुन मारहाण करत होते. त्यामुळे भारतीच्या भावाने तिच्या गावाकडे जावून तिला दवाखान्यात नेवून औषधोपचार केले होते, असे ज्ञानेश्वर कदम यांनी तक्रारीत म्हटले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

Previous Post

नागपुरात भाजपा नेत्याची निर्घृणपणे हत्या, हत्यामागे राजकीय हेतू आहे की आणखी काही?

Next Post

चक्क अल्पवयीन मुलीने वडीलाशी संगममत करून केल हिंदू मुलाचे धर्मांतरण, गुन्हा दाखल.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
चक्क अल्पवयीन मुलीने वडीलाशी संगममत करून केल हिंदू मुलाचे धर्मांतरण, गुन्हा दाखल.

चक्क अल्पवयीन मुलीने वडीलाशी संगममत करून केल हिंदू मुलाचे धर्मांतरण, गुन्हा दाखल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In