उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सुशांत मंगल कार्यालय, नाद्रे रोड माधवनगर सांगली येथे त्रिरत्न बौद्ध महासंघ सांगली केंद्राच्या वतीने निवासी धम्मक्रांती शिबीर दि. 11नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर च्या दरम्यान पार पडले. या शिबिराचे नेतृृत्व धम्मचारी ऋताईन यानी केले. गृहस्थी “जीवन सुखी कारण्यासाठी तथागताचा उपदेश” शिगालवाद सुत्तया विषयावर शिबिरात अभ्यास घेतला गेला. या शिबिरात पूजा, वंदना, योगा, अनापान सती व मेत्ता भावना ध्यान सराव, शिगालवाद सुत या विषयावर प्रवचन, गट चर्चा, संपर्क सराव, तसेच रात्री पंचशिल या विषयावर प्रवचन संपन्न झाले.
या शिबीर यशस्वी करण्यासाठी मुंबई, पुण्याहुन धम्मचारी विजित्तधम्म, अनंतमित्र, श्रध्दादीप, ज्ञानवज्र, कुशलबंधु, बोधीदीप, कमलबोधी, अमितरुचि व सांगली चे धम्मचारी ज्ञानसेन यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले. या शिबिरासाठी स्त्री, पुरूष, मुले, मुली एकून 120 शिबिरार्थी सहभागी झाले होते. या पैकी 19 शिबिरार्थिनी त्रिशरण पंचशील सह 22 प्रतिज्ञा गृहण करून केंद्राचे चेअरमन धम्मचारी विजित्तधम्म यांचे हस्ते धम्म दिक्षा घेतली.
या शिबिराचा सांगता समारोह प्रसंगी धम्मचारी ऋताईन म्हणालें की, शिबिरात सहभागी झालेल्या बंधु भगिनींनी धम्माचा प्रचार प्रसार केला पाहिजे धम्म स्वतः साठी मर्यादित न ठेवता तथागत गौतम बुद्ध व बोधिसत्व प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लोक कल्याणकारी विचार जन सामान्य मानसा पर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करावेत.
या शिबिरासाठी नाममात्र शुल्क घेऊन वनिता परशुराम कांबळे सुशांत गार्डन तथा मंगल कार्यालय उपलब्ध करुन दिले. तसेच आचारी सुनिल कांबळे व त्यांचे सहकारी यांनी शिबिरा साठी सुग्रास भोजन करुन दिले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी सांगली केंद्राचे सर्व धम्ममित्र व सहायक यांनी धम्ममीत्र अजित माने यांचे सहायाने प्रयत्न केले. दिनांक 14 रोजी धम्मप्रसारक सी. आर. सांगलीकर यांनी शिबिरासात भेट देऊन शुभेच्छा दिल्या. शेवटी दिनांक 15 नोव्हेंबर रोजी दुपारी मैत्री गीताने शिबिराची सांगता झाली.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

