पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626
शिवाजीनगर पोलिस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- शिवाजीनगर पोलीस ठाणे च्या रेकॉर्डवरील आरोपी नामे तुषार कैलास काकडे वय 19 वर्षे रा. एस. आर. ए. कॉलनी ए विंग, फ्लॅट नं. 1109 शिंदे वस्ती हडपसर पुणे यास मा.पोलीस आयुक्त सो, पुणे शहर यांचे कार्यालय जा क्र /पीसीबी/डीईटी/शिवाजीनगर/काकडे/590/2023, दिनांक 18/11/2023 अन्वये महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टी वाले,औषधी द्रव्य विषय गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती वगैरे यांच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबत अधिनियम सन 1981 चे कलम 3(2) प्रमाणे 01 वर्षाकरिता अमरावती मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे स्थानबद्ध करण्याचे आदेश झाल्याने नमूद गुन्हेगार यास दि.22/11/2023 रोजी स्थानबद्ध आदेशाची बजावणी केली आहे.
सदरची कारवाई मा. श्री रितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. श्री. संदीप कर्णिक, सह पोलीस आयुक्त पुणे शहर, मा.श्री प्रवीण पाटील, अप्पर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. संदीपसिंह गिल, पोलीस उप-आयुक्त परि-०1, पुणे शहर, मा. वसंत कुवर, सहा पोलीस आयुक्त, विश्रामबाग विभाग, पुणे शहर , व.पो.नि. अरविंद माने, पो. नि. विक्रम गौड (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाप्रमाणे विशाल शिंदे, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार 3081 संतोष मेमाणे (सर्वॆलन्स), पोलीस अंमलदार 9839 रोहित झांबरे (सर्वॆलन्स), पोलीस अंमलदार 1917 दिलीप नागरे (सर्वेलन्स),
सर्व नेमणूक, शिवाजीनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर, यांनी केली आहे.

