पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626
शिवाजी नगर पोलिस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- शहरातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन परिसरात बाल स्नेही कक्षाची स्थापना करण्यात आली. दिनांक 25 नोव्हेंबर रोजी या बाल स्नेही कक्षाचे उद्घाटन कॅरोलिन मॅडम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यावेळी श्री. संदिपसिंह गिल (उपयुक्त परिमंडळ १) श्री. वसंत कुवर (साहाय्यक पोलिस आयुक्त) श्री.अरविंद माने (वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजीनगर पोलीस स्टेशन) श्री.विक्रम गौड गुन्हे पोलीस निरीक्षक शिवाजीनगर पोलीस स्टेशन) सौ.मनिषा जाधव (CWPO ) शिवाजीनगर पोलीस स्टेशन) डॉ. कॅरोलिन ओडियर डी वॉल्टर (सीईओ संस्थापक होप फॉर चिल्ड्रन फाऊंडेशन) श्री. विशाल वाघमारे ,श्री. शकील शेख (व्यवस्थापक) श्री. वसीम शेख ,श्री. शैलेश पाटोळे आणि फिरते पाठक संघ आणि बाल स्नेही अधिकारी मनिषा जाधव, पोलीस उपनिरीक्षक शिवाजीनगर पोलीस ठाणे, भरोसा सेलचे पोलीस निरीक्षक सौ. जाधव आणि अधिकारी व अंमलदार हे उपस्थित होते.
पुणे शहरातील मध्य भागात असलेल्या शिवाजी नगर पोलीस स्टेशन येथे या बाल स्नेही कक्ष उघडण्यात आल्याने या बाल स्नेही कक्षाच्या माध्यमातून बाल गुन्हेगारी मुक्त समाज, लहान बालकावर होणाऱ्या अत्याचार प्रतिबंध, बाल मजदूरी प्रतिंबध, बालकांच्या सुरक्षितेसाठी जागृत करणे सह अनेक अडचणी या माध्यमातून सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
बालकांच्या सुरक्षितेसाठी सरकारने अनेक कायदे केले. त्याचा लाभ सर्व सामान्य बालकांना मिळावा, अन्यायग्रस्त मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी दखल सर्वोच्च न्यायालयाने घेऊन बालकांसाठी नवीन कायदे केले. बारा वर्षा खालील व बारा ते अठरा या दोन वयोगटातील मुले पोलीस स्टेशन मध्ये येतात. यापैकी बारा वर्षाखालील आरोपी मुलांना कायद्यात शिक्षेची तरतूद नाही.मात्र बारा ते अठरा या वयोगटातील मुलांना कायद्याच्या तरतुदी लागू पडतात. अशी माहिती यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी व्यक्त केलं.
यावेळी शकील शेख व त्यांचा स्टाफ तसेच मॉडर्न विद्या मंदिरचे शेकडो विद्यार्थी या कार्यक्रमासाठी त्यांचे शिक्षकासह उपस्थित होते.

