प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. भावी पिढी घडवणारे शिक्षक जेव्हा आपल्या वर्तनाने आपल्या पवित्र विद्यादानाच्या कार्याला काळीमा फासतात अशेच एक प्रकरण दिनांक 25 नोव्हेंबर रोजी कानगाव येथील शाळेत उघडकीस आले
कानगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पैशांची अफरातफर करण्याचा आरोप असलेला वादग्रस्त शिक्षकाने अजून एक नवीन प्रताप केला असून हा शिक्षक शाळेत चक्क दारूच्या नशेत पोहोचल्याने संपूर्ण गावात या शिक्षकावर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची माहिती अल्लीपूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी शाळेत दाखल होऊन या नशेत मदमस्त असलेल्या दारूड्या शिक्षकाला ताब्यात घेतले.
प्राप्त माहितीनुसार, अल्लीपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या कानगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक राजू कांबळे हा सकाळच्या सुमारास शाळेत आले. हे वर्गात शिकवण्यासाठी जात असताना ते शिक्षक दारूच्या नशेत असल्याचे सहाय्यक वर्ग शिक्षिकेच्या लक्षात आले. त्यांनी या घटनेची माहिती व्यवस्थापन शिक्षण समितीचे महिला सदस्य सुवर्णा देवढे यांना दिली. माहिती कळताच व्यवस्थापन कमेटीचे सर्व सदस्य, पोलिस पाटील शाळेत आले. त्यांनी चौकशी केली असता शिक्षक कांबळे दारूच्या नशेत आढळून आले.
यापूर्वी राजू कांबळे या शिक्षकाने शाळेतील पैशाची अफरातफर केल्याची तक्रारसुद्धा झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच अल्लीपूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून नशेत असलेला शिक्षक कांबळे त्यांना पोलिस स्टेशन येथे नेऊन वैद्यकीय चाचणीसाठी पाठवण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास अल्लीपुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रफुल्ल डाहुले करीत आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 / 7385445348

