प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबाईल :- 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहरामध्येच व्हावे या जनतेचा मागणीकरीता सुरू असलेल्या हिंगणघाट मेडिकल कॉलेज संघर्ष समितीच्या धरणे आंदोलनाचा १७५ व्या दिवशी कारंजा चौक राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळ्यासमोर सत्याग्रहाच्या रूपाने घंटानाद करून जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहचविण्याची प्रयत्न केला.
मुंबई येथील पावसाळी अधिवेशनात संघर्ष समितीने आझाद मैदान मुंबई येथील धरणे आंदोलनाचा पार्श्वभूमीवर माजी कॅबिनेट मंत्री आ.जयंत पाटील यांनी सभागृहात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा जिल्ह्यात तीन ठिकाणाहून मागणी असल्याने माझ्या अध्यक्षतेखालील उपसमिती लवकरच योग्य ठिकाण घोषित करेल असे आश्वासन सभागृहात दिले. परंतु ह्याला चार महिने लोटूनही अजूनपर्यंत उपसमितीने कोणताही निर्णय घेतल्याचे दिसून येत नाही. पण प्रत्यक्षात आर्वी आणि वर्धेमध्ये कुठलेही मेडिकल कॉलेज चा मागणीसाठी एक पण आंदोलन किंवा उपोषण झाले नाही आणि हिंगणघाट ला मागील ८ महिन्यापासून सतत विविध प्रकारचे आंदोलन सुरू आहे त्यात विद्यार्थ्यांचे मोठे जन आंदोलन सुद्धा झाले. दरम्यानचा काळात संघर्ष समितीने आंबेडकर चौकात १०० व्या दिवशी अर्धनग्न आंदोलन केले परंतु धृतराष्ट्ररुपी शासनाला आणि लोकप्रतिनिधीं याना ह्या आंदोलनाची तीव्रता दिसून आली नाही.
त्यानंतर समाजसेवक श्याम भाऊ इडपवार यांनी हिंगणघाट येथे अन्नत्याग आंदोलन केले. अविरत धरणे आंदोलनाचा आवाज १७५ व्या दिवशी शासनापर्यंत पोहचतो की शासन बहिरेपणाच सोंग घेते हे बघायचे आहे. जिल्हा प्रशासनाचा मतदार यादी नुसार हिंगणघाट विधानसभेचे मतदार वर्धा मतदारसंघापेक्षा जास्त आहे हे आताच काही दिवसा आधी सिद्ध झालं आहे. ह्या तुलनेत हिंगणघाट समुद्रपुर तालुक्यातील परिसरात कोणतीही उच्चशिक्षणाच्या आणि व्यावसायिक शिक्षणाची सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही त्याव्यतिरिक्त मोहता आणि डागा मिल बंद पडल्यावर कुठलाही मोठा उद्योग येथे आणता आला नाही. तसेच मागील काही वर्षात आरोग्य व्यवस्था पूर्ण पने कोलमडलेली आहे. सरकारी दवाखाना मध्ये तज्ञ डॉक्टर उपलब्ध नाही, रुग्णांना सावंगी सेवाग्राम नागपूर येथे रेफर करण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. मोडुलर ICU चे मोठ्या थाटात उद्घाटन झाले पण अजूनही ते बंद अवस्थेत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. मागील ९-१० वर्षात पाहिजे तसा शैक्षणिक, आरोग्य आणि उद्योग क्षेत्रात शाश्वत विकास झाला नाही. फक्त रोड नाल्याचे भूमिपूजन करून शहराचा आणि ग्रामीण भागाचा विकास होत नाही त्याचबरोबर लोकांचा आर्थिक विकास होणे पण गरजेचं आहे. त्यामुळे रोजगार, शिक्षण आणि आरोग्याला पर्याय म्हणून हिंगणघाटला मेडिकल कॉलेज होन खूप अत्यावश्यक झाले आहे.
वर्धा परिसरात आधीच दोन वैद्यकीय महाविद्यालय असून शिक्षणाचा अनेक संधी आहे. हिंगणघाट इच्छाशक्ती अभावी कायमच वंचित राहिलेला आहे. म्हणून हिंगणघाटच्या मेडिकल कॉलेज संघर्ष समितीला जनतेचा वाढता पाठिंबा मिळत आहे. नुकताच अखिल भारतीय अनुसूचित जाती-जनजाती परिसंघ शाखा हिंगणघाट यांनी मेडिकल कॉलेज चा मागणी सोबतच संघर्ष समितीला जाहीर पाठिंबा दर्शवून नागपूर हिवाळी अधिवेशना दरम्यान होणाऱ्या व्यापक जनआंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा मनोदय निवेदनाद्वारे व्यक्त केला आहे. हिंगणघाट परिसरात जागा उपलब्ध असल्याने शासनाचे करोडो रुपयांची बचत होऊ शकते. या मेडिकल कॉलेजचा लाभ हिंगणघाट विधासभा व्यतिरिक्त यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यातील असंख्य गावांना होऊ शकतो त्यामुळे येथे रोजगारनिर्मिती होऊन उच्च शिक्षणाची आणि चांगल्या आरोग्याची सुविधा उपलब्ध होऊ शकते. पण शासनाने हिंगणघाट कडे पूर्णपने दुर्लक्ष केले आहे की काय असा प्रश्न निर्माण होतो आहे.
हिंगणघाट हे मध्यवर्ती ठिकाण असून राष्ट्रीय महामार्गने अनेक शहराशी आणि गावांशी व्यापारी संबंध आहे. म्हणून शासनाने हिंगणघाट येथेच शासकीय मेडिकल कॉलेज घोषित करावे अशा मागणीचा जोर वाढत आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात हे आंदोलन आणखी उग्र स्वरूप धारण करून शासनाला जेरीस आणल्याशिवाय जनता आता शांत बसणार नाही हे मात्र नक्की.
ह्या आंदोलनामधे संघर्ष समीतीचे वरिष्ठ नेते माजी आमदार राजू भाऊ तिमांडे, अध्यक्ष सुनिल पिंपळकर, कार्याध्यक्ष वासुदेव पडवे, माजी नगराध्यक्ष पंढरी कापसे, अक्षय बेलेकर, सुरेंन्द्र टेंभुर्णे, सुरेंन्द्र बोरकर, सुनिल हरगुडे, गौरव तिमांडे, शकिल अहमद,गौरव घोडे, मनिष दुबे,पप्पु आष्टीकर, बबलु खेणवार, दिवाकर डफ, श्रीराम येळणे इत्यादी मांन्यवर हजर होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 / 7385445348

