नितेश पत्रकार, यवतमाळ उपजिल्हा प्रतिनिधी
मो. नं. 7620029220
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन खडकडोह:- येथे २६ नोव्हेंबर संविधान दिवस व वीर शामादादा कोलाम यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गावातील नागरिकानी खडखडोह गावांतील मुख्य चौकामध्ये भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबसाहेब आंबेडकर व क्रांतीवीर शामादादा कोलाम याच्या प्रतिमेचे बोर्ड उभारण्यात आले. यावेळी त्याच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते कृष्णाभाऊ कोडापे यांनी सांगितले की, २६ नोव्हेंबर म्हणजेच संविधान दिवस कारण, संविधान या राष्ट्रग्रंथाने सर्व भारतीय नागरिकास प्राणी मात्राना सर्वांना तारले आहे. आज २६ नोव्हेंबरला खडकडोह येथे विर शामादादा कोलाम यांची जयंती साजरी करण्यात आली.
यवतमाळ जिल्ह्यातील बिटरगावहून चार किलोमीटर अंतरावर, विदर्भ रॉबिनहूड श्यामा कोलामची टेकडी आहे. या टेकडीला भेट देऊनच पैनगंगा अभयारण्याच्या सहलीला सुरुवात होते. यवतमाळ जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील निरंजन माहूर येथे जन्मलेला श्यामा कोलाम हे एक सामान्य नागरिक होते. आज २६ नोव्हेंबर संविधान दीन व वीर शामादादा कोलाम यांच्या जयंतनिमित्त खडकडोह येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,
युवा समितीच्या वतीने अतिशय सुंदर अशा पद्धतीने कार्यक्रमाचे नियोजन करून कार्यक्रम पार पडला त्या वेळेस गावातील प्रतिष्ठित नागरिक बापूराव टेकाम, सोनू मडावी, नारायण टेकाम, किसन आत्राम, कृष्णा कोडापे, मारोती आत्राम, सोनू आत्राम, दादाजी टेकाम, विठ्ठल कुमरे, सुनील टेकाम, रणजित आत्राम, विकास आत्राम व नियोजक अंकुश चांदेकर, सुनील नैताम, धनराज परचाके, प्रवीण मरसकोल्हे व गावातील नागरिक उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

