हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा. 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- दि बल्लारपूर कॉलरी एम्प्लॉइज को -ऑप सोसायटी च्या निवडणुकीत विमुक्त जाती/भटक्या जमाती गटातून स्वतंत्र उमेदवार चेतन देवाजी गेडाम विजयी झाले. काल २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या पंचवार्षिक निवडणूक चुरशीची लढत झाली.
यावेळी 11 जागांसाठी 23 उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले होते. चुरशीच्या लढतीत सर्वसाधारण गटातून प्रकाश तोताराम खरतड, ज्ञानेश्वर सूर्यभान मुरकुटे, रवींद्र व्यंकटी बंडी, शैलेश वसंतराव कठाणे, प्रशांत भाऊराव चिकनकर, शेख अझहर युसुफ, अनुसूचित जाती /जमाती गटातून देवेंद्र बाबुराव दुर्योधन, विमुक्त जाती/ भटक्या जमाती गटातून चेतन देवाजी गेडाम, इतर मागासवर्गीय गटातून प्रशांत वामनराव पारखी, महिला राखीव गटातून अंजली सुनील इंदनुरी व सुनंदा भास्कर लांडे विजयी झाले.
चेतन गेडाम हे इंटक कामगार संघटनाचे कार्यकर्ता तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे सहसचिव आहेत.

