रूपसेन उमराणी, मुंबई ब्यूरो चीफ
मुंबई:- येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यामुळे सर्विकडे संताप व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईत 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी याकुब मेमनने अनेक निरपराध लोकांचे जीव घेतले त्याच आतंकवादी याकूब मेमन ची कबर मस्त संगमरवरी आणि लायटिंग लाऊन साजवल्या जात आहे अशी माहिती महाराष्ट्र संदेश न्युजला प्राप्त झाली आहे.
मुंबईत 1993 च्या बॉम्बस्फोटातील आतंकवादी याकुब मेमनच्या कबरीला इतकी व्हीआयपी ट्रीटमेंट कशी मिळू शकते हा प्रश्न मुंबई बॉम्बस्फोटात मयत झालेल्या लोकांचे नातेवाईकांना पडला आहे.
मुंबईत एका व्यक्तीच्या कबरीसाठी संगमरवरी दगडाने बांधकाम, सर्वत्र एलईडी लाईट्स आणि चोवीस तास खडा पहारा. हे आहे मुंबईतील बडा कब्रस्तानमध्ये एका कबरीला ही अशी उच्च दर्जाची वागणूक देण्यात येत आहे. ही कबर कोणत्या संत बाबा किंव्हा पीरबाबाची नाही तर ती मुंबईतील सर्वात मोठा गुन्हेगार, दहशतवादी असलेल्या याकुब मेमनची आहे. मुंबईतील 1993 साली झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी याकुब मेमनला जिथे दफन करण्यात आले आहे ती कबर जमीन त्याच्या कुटुंबाने खरेदी केली आहे का? मुस्लिम दफनभूमी ट्रस्टींनी विकली आहे का? असा सवाल विचारला जात आहे.
मुंबईतील 1993 साली झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी याकुब मेमनला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. जुलै 2015 ला त्याला फाशी दिल्यानंतर त्याच्या प्रेताला दक्षिण मुंबईतील बडा कब्रस्तानमध्ये दफन करून अंतिमसंस्कार करण्यात आले होते पण आता त्या ठिकाणच्या ओठ्याला एकंदरीत संगमरवरी बसवण्यात आल्या आहेत. त्यावर एलईडी दिवे लावले आहेत. हे दिवे रात्रीच्या वेळी चालू असतात आणि मुख्यतः मेमनच्या कबरीवर प्रकाश टाकण्यासाठी लावण्यात आले आहेत. एका कोपऱ्यात स्विच बोर्ड लावून या कबरीसाठी वीजपुरवठा केला जातो. कबर जमीन विकली नाही तर फाशी झालेल्या दोषीच्या कबरला इतकी व्हीआयपी वागणूक का? असा सवाल विचारला जात आहे.
आतंकवादी याकुबच्या कबरीची मजार करण्याचा प्रयत्न सुरु आहे का?
मुंबईत 1993 साली साखळी बॉम्बस्फोट झाले. त्यात 257 निरपराध लोकांनी आपले जीव गमवले, तयार शेकडो लोक गंभीर जख्मी झाले होते. या प्रकरणात याकुबला अटक झाली. फाशी झालेला तो एकमेव आरोपी होता आणि त्याच्याच कबरीला आता पिरबाबाच्या मजारी सारखं सजवण्यात आलं आहे. एका आतंकवादी चा इतका उदो उदो होत असेल तर ही खूप मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.

