पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626
वाकड पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- वाकड पोलीस ठाणे येथे दिनांक १८ / ११ / २०२३ रोजी इन्स्टाकार्ट सर्व्हिस प्रा. लि., काळेवाडी, पुणे या फ्लिपकार्ट च्या हबमधील मॅनेजर यांचे तक्रारीवरुन त्यांचे हबमधील कामगार यांनी एकुण ९,४७,१६०/- रुपये किं.चे विविध कंपनीचे एकूण ३८ मोबाईल चोरीस गेलेबाबत वाकड पोलीस ठाणे गु.र.नं. १११३ / २०२३ भा.द.वि. कलम ३८१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्यातील आरोपी व त्याचे इतर साथिदार यांचा शोध घेऊन गुन्हयातील चोरीस गेलेले मोबाईल फोन जप्त करणेबाबत मा. श्री. विनयकुमार चौबे सो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी वाकड पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना आदेश दिले होते.
त्या अनुषंगाने मा. श्री. गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाकड पोलीस ठाणे यांनी दाखल गुन्ह्याचे तपासाचे आदेश वाकड पोलीस ठाणे तपास पथकाचे अधिकारी यांना दिले. त्याप्रमाणे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार तांत्रीक व पांरपारीक पध्दतीने तपास सुरु केला. दसरा व दिवाळी चे पुर्वी फ्लिपकार्ट मध्ये ‘बिग बिलीयन डे’ हा सेल असतो. त्या काळात ग्राहकांची खरेदी प्रमाणे वाढलेले असते, त्यामुळे फ्लिपकार्ट च्या हबमध्ये मोठ्या प्रमाणात वस्तुंची आवक-जावक असते. त्याच काळात हबमध्ये काम करणा-या कामगांरा पैकी काही कामगांरानी वाढलेल्या कामाचा लोढचा फायदा घेत गुन्हा केला असण्याचे निष्पन्न झाले. तपासात सुरवातीला डिलीव्हरी बॉय म्हणुन काम करणारा आशिष भाऊसाहेब भोसले, वय २२ वर्षे, रा. रमाबाई नगर, पिंपरी लिंकरोड, दावत राईस शेजारी, सिमला हॉटेलजवळ, पिंपरी, पुणे यास व एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेतले असता. एकुण ०८ मोबाईल फोन मिळाले. सदर आरोपीची पोलीस कस्टडी प्राप्त करून तपास केला असता, आरोपी नामे पियुष गोविंद मोहिते, वय २३ वर्षे, रा. नमो सृष्टी अपार्टमेंट रुम नं. बी / ३०१, गणेश इंटरनॅशनल स्कुल शेजारी, नेवाळे वस्ती, चिखली, पुणे याचे नाव निष्पन्न झाल्याने त्यास अटक करुन एकञित कौशल्यपुर्ण तपास केला. तपासात सर्व आरोपीकडून एकुण ५,९१,२४४/- रुपये किंमतीचे विविध कंपनीचे २४ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. दाखल गुन्ह्याचा उर्वरित मोबाईल बाबत तपास सुरु आहे.
सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे सो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. संजय शिंदे सो सह पोलीस आयुक्त, मा. श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा. श्री. डॉ. काकासाहेब डोळे सो, पोलीस उप आयुक्त, परि-२ पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त सो, वाकड विभाग, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. गणेश जवादवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मा. श्री. विठ्ठल साळुंखे पोलीस निरीक्षक (गुन्हे), सपोनि संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण, सपोफ. विभीषण कन्हेरकर, सपोफी बाबाजान इनामदार, सपोफी. राजेंद्र काळे, पोहवा. संदीप गवारी, पोहवा. स्वप्निल खेतले पोहचा. दिपक साबळे, पोहवा. अतिश जाधव, पोहवा, प्रमोद कदम, पोहवा. बंदु गिरे, पोना. प्रशांत गिलबीले, पोना. अतिक शेख, पोना विक्रांत चव्हाण, पोना. राम तळपे, गोशि. अजय फल्ले, पोशि भास्कर भारती, पोशि. स्वप्निल लोखंडे, पोशि सौदागर लामतुरे, पोशि कांतेय खराडे, पोशि विनायक घारगे, पोशि रमेश खेडकर, पोशि सागर पंडीत (परि-०२ कार्यालय) यांनी मिळून केली आहे…

