पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626
कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- दि. २५/०८/२०२३ रोजी ते दि. ०६/११/२०२३ रोजीचे दरम्यान घरामध्ये घरमालक हजर असताना कोणीतरी अज्ञात इसम हा उघड्या दरवाज्यावाटे घरात प्रवेश करुन पहिल्या मजल्यावरील बेडरूम मध्ये जावून लाकडी कपाट उघडुन त्यातील ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या दागिन्यामधील सुमारे ८ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरी करून नेल्याबाबत कोंढवा पोलीस ठाणे पुणे येथे गु.र.नं. ११४६ / २०२३ भा.द.वि. कलम ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे..
सदरचा गुन्हा घडल्यानंतर मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली कोंढवा तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक श्री दिनेशकुमार पाटील व तपास पथकातील अमलदार यांनी तपास सुरू केला. सपोनि पाटील हे घरातील कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या लोकांकडे तपास करीत असताना त्यांना परातीलच एकानेच सदरचा गुन्हा केला असावा असा संशय आला. सदर संशयीत मुलगा हा घरातीलच असल्याने तसेच तो एलएलबी चे शिक्षण घेत असल्याने त्यास पोलीस खाक्या दाखविणे शक्य नव्हते. त्यामुळे सपोनि पाटील यांनी मानसशास्त्रीय पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला.
सदरबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष सोनवणे यांना कल्पना दिली. त्याचवेळी पोलीस स्टेशनला इतर गुन्ह्यातील सराईत आरोपीकडे गुन्ह्यातील संशयीत इसमासमक्ष तपास करण्यास सुरवात केली. सराईत आरोपीस पोलीस खाक्या दाखविल्याचे सदर संशयीत इसमाने पाहिले, तेव्हा त्यास घाम फुटला. आपल्यावरही हा प्रयोग होऊ शकतो. या भितीने त्याने तोंड उघडले आणि चोरी केल्याची कबुली दिली. व त्याने चोरीस गेलेले सोन्याचे ४,००,०००/- रु. कि. चे ८ तोळ्याचे दागिने हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला आहे.
वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त सो. श्री संदिप कर्णिक, श्री मा. अपर पोलीस आयुक्त सो श्री रंजन कुमार शर्मा, मा. पोलीस उप-आयुक्त सो. परिमंडळ-५ श्री विक्रांत देशमुख, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग साो. शाहुराव साळवे, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो. श्री संतोष सोनवणे कोंढवा पोलीस स्टेशन, मा. पोलीस निरीक्षक सो. गुन्हे श्री संदीप भोसले व श्री संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे सपोनि दिनेशकुमार पाटील, सपोनि लेखाजी शिंदे, पोहवा / ११६१ सतिश चव्हाण, पो. हवा. ६९५१ विशाल मेमाणे व पो. हवा. १४२२ लवेश शिंदे, पोहवा. ७९ निलेश देसाई, पोअम. ८५९१ लक्ष्मण होळकर, पो.शि. ९८३८ संतोष बनसुडे, पो. शि. १०११६ ज्ञानेश्वर भोसले व पोअम २१८५ सुजीत मदन या पथकाने केली आहे.

