उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांची बुधवार दि.29 नोव्हेंबर रोजी सांगली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम मध्ये सत्ता संपादन निर्धार सभा होणार आहे. या सभेची सर्व तय्यारी झाली आहे. या सभेसाठी कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यातून लोक उपस्थित राहणार आहेत अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रभारी संतोष सुर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रभारी संतोष सुर्यवंशी यांनी महाराष्ट्र संदेश न्युजशी बोलताना म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वर्षा पासून विशिष्ट कुटुंबाची सता आहे ही सता कुटुंबाच्या बाहेर नाही गेली पाहिजे अशी व्यवस्था कार्यरत आहे. ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब यांची भूमिका ही भूमिका मांडणेसाठी महाराष्ट्रातील वंचित घटकातील लोकांचे प्रश्न याच घटकातील लोक प्रतिनिधी लोकसभा विधान सभेत जावेत अशी आहे ते म्हणाले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आलटून पालटून सत्ता उपभोगली आहे. मात्र, यापैकी कोणीही धनगर मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही.
बुधवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.00 वाजता ही सभा होणार असून या सभेची तयारी झाली आहे. या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

