उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- प्रा.ऍड मुकुंद खैरे सर यांची दूरदृष्टी पाहता सहा डिसेंबर 1991 ला समाज क्रांती आघाडीची स्थापना स्थापनेच्याच दिवशी संघटनेचे ब्रीदवाक्य होते (1) संविधानाचे संरक्षणकरणे. (२) संविधानाचे राज्य निर्माण करणे या अभ्यासपूर्ण विचारातून संघटनेची घोडदौड सुरु झाली पाहता पाहता संविधानाचे संरक्षण केले. घटना दिन साजरा करा हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात समाज क्रांती आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मुकुंद खैरे सर यांच्या नेतृत्वात केले.
आज या देशातील तमाम लोकांना न्याय मिळाला. संपूर्ण देशभरात संविधानाचा सन्मान होत आहे. हा संविधानिक विचार समाज क्रांती आघाडीने मांडलेला होता. याचे संपूर्ण श्रेय समाज क्रांती आघाडीला जाते. त्याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जागृतीचा विस्तव विझता कामा नये म्हणून पुनश्च नव्या जोमाने समाज क्रांती आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज शेंडे यांच्या नेतृत्वात संविधानिक लढयाला गतिमान करण्या साठी शिका, संघर्ष करा आणी संघटित व्हा या चेतावणीला समजून घेण्यासाठी व संविधानाचा प्रचार, प्रसार व्हावा आणी राहलेले महत्वपूर्ण कामे म्हणजे ईव्हीम हटाव देश बचाव.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दिलेल्या २२ प्रतिज्ञांच्या आधारावर भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद २४६ नुसार इतर धर्माप्रमाणे बौद्धांचा व्यक्तिगत कायदा तयार व्हावा २४ जुलै २०१८रोजी दिल्ली संसद भवनावर बौद्धांचा देशव्यापी मोर्चा काढून दिवंगत ऍड. शताब्दी खैरे यांनी तयार केलेले २०० पानी अभ्यासपूर्ण बिल सादर केलेले आहे. त्यावरच बुद्धगया मुक्त अवलंबून आहे, राईट टू वर्क, बेरोजगारांना रोजगाराचा हक्क (अनुच्छेद ४१ नुसार) भूमिहीनांना जमिनीचा हक्क (अनुच्छेद ३७ नुसार) आणी बेघरांना घरांचा हक्क (अनुच्छेद २१ नुसार )हे पण बिल एडवोकेट शताब्दी खैरे नागपूर हायकोर्ट यांनी सादर केले आहे असे असंख्य प्रश्न शिल्लक आहेत ते धजास लावण्यासाठी व संविधानिक लढे लढण्यासाठी समाजामध्ये जागृती करण्यासाठी सरकारला वेठीस धरण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे काळाची गरज आहे.
हे सरकार सर्वसामान्याच्या हिताचे नसल्यामुळे वेळेवर कामे होतं नाहीत त्याकरिता जनतेतून आवाज उठवणे आवश्यक आहे या हेतूने सर्व संविधान प्रेमी तसेच जुने जाणते आजी माजी कार्यकर्ते व शाबूत डोक्याच्या लोकांनी अकोला येथे होऊ घातलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात तण, मन, धन हे त्रिसूत्री धोरण स्वीकारून न चुकता, संविधान, व महापरीनिर्वाण दीना निमित्त शनिवार दि.9 डिसेंबर 2023 रोजी वेळ ठीक 12.00 वाजता स्थळ:- जिल्हा परिषद कर्मचारी भवन, आकाशवाणी समोर अकोला येथे हजर राहावे. असे आवाहन समाज क्रांती आघाडीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बंडूदादा वानखडे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.

