हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा. 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- ४ डिसेंबर रोजी सायंकाळी इंटक कार्यालय बल्लारपूर येथे आर. शंकरदास क्षेत्रीय अध्यक्ष बल्लारपूर क्षेत्र यांच्या अध्यक्षतेखाली मासिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत संघटनात्मक चर्चा झाली तसेच कंत्राटी मजुरांच्या प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच बल्लारपूर कॉलरी पतसंस्था मध्ये निवडून आलेले चेतन गेडाम, रवि बंडी यांचा सत्कार करण्यात आला तसेच सेवानिवृत्त पदाधिकारी अनिल देशपांडे यांच्याही सत्कार केले. सभेत आर शंकरदास यांनी मार्गदर्शन केले.
या सभेचे संचालन सुरेश डाहुले यांनी केले तर बंडू लांडे यांनी आभार मानले. बैठकीत सीताराम निर्मल, संपत,सुरेश केवट, घनश्याम लांडे, रामटेके, देवियाल अंबाला, जयदेव रंगारी, राजु पोटे, के.राजेश, दुर्गराज आरेकर, सेंगर, अनिल देशपांडे, सुरेश खंडारे , मोतीलाल वर्मा,प्रांजल मिलमिले, कार्तिक दरेकर, घनशाम लांडे,सुबोधित डेविड कम्पेली सह सर्व प्रादेशिक, उपप्रादेशिक व युनिट अध्यक्ष/सचिव, इतर अधिकारी व सक्रिय कामगार, खाजगी वाहन चालक, कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते.

