नितीन शिंदे ठाणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- दि.५ डिसेंबर रोजी रात्री ०९.०० वा. सुमारास एम. आय. डी. सी. प्लॉट नं. 1 रोड नं. 8, बँक ऑफ महाराष्ट्र समोर, वागळे इस्टेट ठाणे या ठिकाणी दोन अनोळखी इसमांनी भिंतीला लावलेल्या ए.सी च्या एक्सटेरीयर युनिट कॉपर पाईप तोडत असताना महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचा सुरक्षा रक्षक यांनी पाहिले असता कर्तव्य पार पाडण्यासाठी त्यांनी चोरटयांना पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना आरोपीने कमरेचा सुरा दाखवुन गप्प राहण्याचा इशारा करुन ढकलून दिले. त्यामध्ये त्यांचे हाताचे पंजाला इजा झाली. त्यामध्ये आरोपी यांनी वीस रुपये किंमतीचे ए.सी. च्या एक्सटेरीयर युनिटचे दोन कॉपरचे पाईप चोरून नेले. याबाबत दिनांक 6 डिसेंबर रोजी सायंकाळी तकार दिल्याने श्रीनगर पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. २६४/२०२३, भादवि कलम- ३३२, ३५३, ३८२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
श्रीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक किशोर बोडके व तपास पथकाचे पोलीस अंमलदार यांनी आरोपी इसम १) विरेंद्र दिनेश सहानी, वय १९ वर्षे, रा.ठाणे, २) संतोष रंगबहादुर सोनार, वय २० वर्षे, रा. ठाणे यांचा शोध घेवुन ०२ तासाच्या आत आरोपी यांना अटक केली.
सदरची कामगिरी पोलीस उपआयुक्त, परि-५, वागळे इस्टेट, ठाणे अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त, वागळे विभाग, ठाणे गजानन काब्दुले यांचे मार्गदर्शनाखाली श्रीनगर पोलीस स्टेशनवे वपोनिरी/किरकुमार कबाडी, पोलीस उप निरीक्षक किशोर बोडके, सहा. पो. उपनिरी. माणीक इंगळे, पोलीस अंमलदार निलेश शेडगे, निलेश थुत्रे, विनोद साळुंखे यांनी पार पाडली आहे.

