राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतीनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जिवती:- तालुक्यातील शंकर पठार येथे अकरा केवी विद्युत तार तुटल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या सतीश गोविंद काळे या मुलाचे उपचार चंद्रपूर ग्रामीण रुग्णालय चंद्रपूर येथे सुरू असून त्यांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. गोविंद काळे यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांच्या मुलाच्या उपचारासाठी महावितरण तर्फे आपल्या स्तरावर आर्थिक मदत करण्यात यावी असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे जिल्हा सचिव चंद्रप्रकाश बोरकर यांनी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष हकानी शेख, नागेश खांडेकर, सुधीर चिटगिरे, सारिका नंदेवार यांनी आज दि 11 डिसेंबरला कार्यकारी अभियंता तालुका जिवती जिल्हा चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले.
9 डिसेंबर शनिवारला शंकर पटार मध्ये महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे एका सहा वर्षीय मुलाला 11 केवीचा करंट लागून तो गंभीर जखमी झाला त्याचे उपचार ग्रामीण रुग्णाल चंद्रपूर येथे सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोनवरून सूचना देण्यास फोन लावले असता फोन कोणीही उचलला नाही. त्या गावात असलेली डीपी तात्काळ स्थलांतरित करण्यात यावी आणि लाईनमन व अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे 8 दिवसाच्या आत दोशींवर कारवाई न केल्यास दिनांक 20 डिसेंबर पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे महावितरण कंपनीविरुद्ध कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही महाराष्ट्र नवनिर्माण सेना या निवेदनातून दिले आहे.

