Saturday, February 28, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

राष्ट्रीय मानवाधिकार हा राज्य घटनेने दिलेला प्रत्येक नागरिकांचा मुलभूत अधिकार: खासदार अशोक नेते

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 13, 2023
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
राष्ट्रीय मानवाधिकार हा राज्य घटनेने दिलेला प्रत्येक नागरिकांचा मुलभूत अधिकार: खासदार अशोक नेते
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राष्ट्रीय मानवाधिकार दिवसानिमित्त विविध क्षेत्रातील दिडशे लोकांचा सन्मान सत्कारामुळे काम करण्याची प्रेरणा, समाज सेवकांचे जिल्हाच्या विकासात मोठे योगदान : प्रणय खुने

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- राष्ट्रीय मानवाधिकार दिवसाचे औचित्य साधून गडचिरोलीत राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनिय योगदान देणाऱ्या १५० व्यक्तींचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पदक देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी राज्यघटनेने आपल्याला दिलेले अधिकार कोणीही हिरावू शकत नाही, असे सांगत समाजात चांगले काम करणाऱ्यांचा सत्कार केल्याने त्यांच्यासोबत इतरांनाही चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन केले.

यावेळी विशेष प्रमुख पाहुणे म्हणून अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम, आ.कृष्णा गजबे, आ.डॅा.देवराव होळी, माजी आ.दीपक आत्राम, पद्मश्री परशुराम खुणे यांच्यासह राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महेश पटेल, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, राष्ट्रीय मानवाधिकार संगठने चे प्रदेश अध्यक्ष प्रणय खुणे, माजी सभापती नाना नाकाडे, विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, शिवसेनेचे (उबाठा) जिल्हाध्यक्ष (आरमोरी क्षेत्र) सुरेंद्रसिंह चंदेल, विदर्भ अध्यक्ष जावेद अली, पायल कापसे महिला विदर्भ अध्यक्ष, पौर्णिमा जी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलतांना खासदार अशोक नेते म्हणाले, मानवाधिकार हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. कोणत्याही जात, धर्म, पंथ, लिंग, राष्ट्र, प्रांत इत्यादींच्या आधारे कोणालाही मानवी अधिकार नाकारता येणार नाही. प्रणय खुणे मला नेहमी या मानवाधिकारा संबंधी बोलायचे, परंतु आज गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त, आकांक्षित, अविकसित जिल्ह्यात त्यांच्या प्रयत्नाने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा मानसन्मान झाला. त्यामुळे त्यांचा काम करण्याचा उत्साह आणखी वाढेल. एक चांगला कार्यक्रम खुणे यांनी घडवून आणला. व्यवसायाने ते आता कंत्राटदार असून सुद्धा सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी नेहमी तत्पर राहतात. त्यांच्या हातून प्रभावीपणे चांगले काम घडावे, अशा शुभेच्छा खासदार नेते यांनी आपल्या मनोगतातून दिल्या.

आपल्या प्रास्ताविकातून राष्ट्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्लीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रणय खुणे यांनी संघटनेची भूमिका मांडली. काही लोक संघटनेच्या नावाचा गैरवापर करतात. त्यामुळे संघटना बदनाम होते. पण या संघटनेच्या बाबतीत असे होणार नाही, असा विश्वास देऊन संघटनेच्या माध्यमातून लोकांसाठी चांगली कामे केली जाणार असल्याचे सांगितले. राजकीय, सामाजिक, पत्रकारिता आणि शासकीय सेवेतील उल्लेखनिय व्यक्तींच्या या सत्कार सोहळ्यासाठी गोंडवाना कलादालन भरगच्च भरले होते. कार्यक्रमाचे संचालन गोंडवाना सैनिकी स्कूलचे उपमुख्याध्यापक ओमप्रकाश यांनी केले.

या कार्यक्रमासाठी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रणय एल खुने, विदर्भ अध्यक्ष जावेद अली, विदर्भ महिला अध्यक्ष पायल कापसे, राष्ट्रीय वरिष्ट उपाअध्यक्ष विजय दामोदर्जी बनी, राष्ट्रीय महिला प्रकोष्ठ अध्यक्ष पोर्णिमा मैडम, विदर्भ सचिव अनिल गुरनुले, राष्ट्रीय प्रवक्ता एवं महाराष्ट्र प्रदेश चयन समिति अध्यक्ष ज्ञानेंद्र एस विश्वास विदर्भ संघटन प्रमुख राम लांजेवार, राहुल झोडे तसेच संघटनेच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

शंकर पठार येथे 11 केवी विद्युत तार तुटल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या सतिश काळे ला आर्थिक मदती साठी मनसे चे निवेदन.

Next Post

तडीपार केलेल्या सराईत गुन्हेगारास समर्थ पोलीस स्टेशनने ठोकल्या बेडया

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
तडीपार केलेल्या सराईत गुन्हेगारास समर्थ पोलीस स्टेशनने ठोकल्या बेडया

तडीपार केलेल्या सराईत गुन्हेगारास समर्थ पोलीस स्टेशनने ठोकल्या बेडया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In