हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा.9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- भारतीय बौद्ध महासभा राजुरा शाखा कडून लुंबिनी बुध्द विहार बामणवाडा, तक्षशिला बुध्द विहार गोवरी , सुविकस बौध्द मंडळ गोयेगाव , वरुर रोड, भेदोडा, सोंडो, लक्कडकोट या सर्व विहारांतील पदाधिकाऱ्यांना धम्म बांधव भगिनीं येथील नागरिक एकत्र येऊन या कार्यक्रमाला सुरुवातिला प्रथम तथागत गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भैय्या साहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करून, अगरबत्ती मोमबत्ती प्रज्वलित करण्यात आली. यानंतर सामूहिक त्रीशरण पंचशील घेण्यात आले. त्यानंतर लुंबिणी बुध्द विहार बामणवाडा मध्ये प्रबोधनाचे कार्यक्रम घेण्यात आले.
महापुरुषाचे कार्य व विचार यांची प्रेरणा आणि भारतातील बौद्धांच्या वर्तमान काळात कर्तव्य व जबाबदारी तसेच भैय्या साहेब उर्फ यशवंत आंबेडकर यांच्या जीवनावर प्रमुख मार्गदर्शन आयु.भिमराव खोब्रागडे उपाध्यक्ष, आयु.धर्मुजी नगराळे, अध्यक्ष यांनी समाज प्रबोधन केले. तर आयु.नी.उषाताई नगराळे, विद्या करमनकर, ममता जीवने, उज्वला वाघमारे यांनी आपले मनोगत मध्ये जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे संचालन आयु.गौतम चौरे सरचिटणीस तर आभार प्रदर्शन वैभव नळे यांनी केले शेवटी सरणत्य घेऊन समारोप केला.
या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा, मिलिंद संजोग मंडळ, रमाबाई महिला मंडळ बामणवाडा येतील प्रत्येक बौद्ध बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली होती.

