पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626
समर्थ पोलिस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- समर्थ पोलीस ठाणेकडील तपास पथकातील अधिकारी पोलीस अमंलदार समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार हेमंत पेरणे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, समर्थ पोलीस स्टेशनकडील तडीपार गुन्हेगार दिपक सुभेदार परदेशी वय २३ वर्ष, रा. सदाआनंदनगर, मंगळवार पेठ पुणे, हा के. ई. एम्. हॉस्पिटल समोरील बाजुस एस्. व्ही. युनियन गेट शेजारी, सोमवार पेठ पुणे येथे बसलेला आहे. लागलीच सदरची माहीती त्यांनी वरिष्ठांना कळवून त्याला स्टाफच्या मदतीने सापळा रचून ताब्यात घेतले. त्यास परवानगी बाबत विचारणा केली असता, त्याने पुणे जिल्हयात येण्याकरिता कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे समजले. त्यामूळे सदर गुन्हेगाराने पोलीस उपायुक्त साो परिमंडळ १ यांचा आदेश क्रमांक १४/२०२३ नुसार पोलीस आयुक्तालय पुणे शहर व संपूर्ण पुणे जिल्हा हद्दीतून तडीपार केलेले असताना देखील त्याने आदेशाचा भंग केला म्हणून सदर गुन्हेगार दिपक परदेशी यांस अटक करुन समर्थ पोलीस स्टेशन येथे गु. र. नं २६७/२०२३ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्हेगारावर यापुर्वी खुनाचा प्रयत्न, खंडणी मागणे, बेकादेशीर हत्यार बाळगणे, असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी ही मा. प्रविण पाटील अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर, मा. श्री संदीप गिल्ल, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १ पुणे शहर, मा. श्री. अशोक धुमाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे श्री. सूरज बंडगर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पो.स्टे, प्रमोद वाघमारे, पोलीस निरीक्षक, (गुन्हे) यांचे मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक सौरभ थोरवे, सुनिल रणदिवे, पोअं, हेमंत पेरणे, सपोफौ. दत्तात्रय भोसले, पोहवा. संताष डमाळे, पोहवा. गणेश वायकर, प्रमोद जगताप, रोहीदास वाघेरे, पोना. रहीम शेख, पोअं. अमोल शिंदे, शरद घोरपडे यांनी केली आहे.

