रविंद्र भदर्गे, जालना उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- मंठा तालुक्यातील अनेक नागरिकांचा घरकुलाचा प्रश्न सह विविध मागण्यासाठी दिनांक 18 डिसेंबर सोमवारया वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंठा पंचायत समिती कार्यालयाला निवेदन देण्यात आले.
मंठा तालुक्यातील अनेक नागरिकांचा घरकुलाचा प्रश्न आहे तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजने अंतर्गत लाभार्थ्यांना ज्या विहिरी मंजूर झालेले आहेत त्या लाभार्थ्यांच्या विहिरीचं काम हे मार्काउटमुळे स्थगित आहे. तरी गटविकास अधिकारी यांनी ज्या विहीरी मंजूर झालेल्या आहेत त्या विहिरीचं मार्कआउट देऊन शेतकऱ्यांना विहिरीचे काम करण्यास परवानगी द्यावी व तसेच रोजगार हमी अंतर्गत तालुक्यातील कामगारांना काम द्यावे. तसेच तालुक्यातील घरकुलांच्या लाभार्थ्यांना त्यांच्या घरकुल कामासाठी हप्ते लवकरात लवकर वितरित करावेत पंचायत समिती कार्यालयामध्ये अनुपस्थित कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी तालुक्यातून येणाऱ्या लाभार्थ्यांच्या चक्रा कमी झाल्या पाहिजेत अशा अनेक प्रश्नांसाठी वंचित बहुजन आघाडीचे च्या वतीने पंचायत समिती तहसील कार्यालय व मंठा पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आलेले आहेत.
जर येत्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांचे व लाभार्थ्यांचे काम मार्गी लागले नाही. तर वंचित बहुजन आघाडीचे वतीने मंठा पंचायत समिती कार्यालयाला कुलूप ठोकू असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सुभाष जाधव यांनी दिलेला आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मंठा तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी, लाभार्थी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

