देवेंद्र शिरसाट हिंगणा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या असल्याने सर्वच राजकीय पक्ष मोर्चेबांधणीला लागले आहेत, देशभरात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी स्थापन केली आहे. महाराष्ट्रात या आघाडी ठराविक पक्ष सोडले तर अजूनही बऱ्याच पक्षांना सामावून घेतले नाही त्यामुळे बरेच पक्ष लोकसभा निवडणुकी आधी इंडिया आघाडीत समाविष्ट होऊ इच्छितात त्यापैकी एक म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) या पक्षाची सभा नुकतीच नागपुरात पक्षाचे जिल्हाध्यक्ष दुर्वास चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस मोहनलाल पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
या वेळी मोहनलाल पाटील म्हणाले की पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची इंडिया आघाडीतील नेत्यांसोबत बोलने चालू आहे,जर इंडिया आघाडीत बाबासाहेब आंबेडकर यांचा रिपब्लिकन पक्ष सहभागी करून न घेतल्यास पक्ष स्वबळावर महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्वच म्हणजे ४८ जागेवर आपले उमेदवार उभे करेल असेही यावेळी मोहनलाल पाटील म्हणाले ते धम्म क्रांती परिसरातील डाॅक्टर आंबेडकर स्कूल ऑफ पाॅलिटिक्स च्या सभागृहात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
डॉक्टर पाटील सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यासाठी दौऱ्यावर आहेत.पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आयुष्मान दीपक भाऊ निकाळजे यांच्या अध्यक्षतेखाली चेंबूर मुंबई येथे पक्षाच्या केंद्रीय कार्यालयात झालेली बैठक आटोपुन डॉ. मोहनलाल पाटील दिनांक १५ डिसेंबरला नागपूरला आले.धम्मक्रांती परिसरातील डॉक्टर आंबेडकर स्कूल ऑफ पॉलिटिक्सच्या सभागृहात नागपूर जिल्हा अध्यक्ष दुर्वास चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत डॉ. पाटील यांनी मार्गदर्शन केले. डॉ मोहनलाल पाटील म्हणाले:I.N.D.I.A आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करून रिपाइं (आंबेडकर) पक्षाने दोन लोकसभेच्या जागेची मागणी केली आहे. दक्षिण मध्य मुंबई व अमरावती यापैकी एक तरी जागा मिळावी असा आग्रह पक्षाने इंडिया आघाडीकडे केलेला आहे. असे न झाल्यास लोकसभेच्या ४८ ही जागेवर उमेदवार उभे करु असेही डॉक्टर पाटील यांनी स्पष्ट केले.
या सभेच्या अध्यक्षस्थानी असलेले नागपूर जिल्हा अध्यक्ष दुर्वास चौधरी यांनी कार्यकर्त्यांसमोर आगामी लोकसभा निवडणुकीबद्दल पक्षाची भूमिका स्पष्ट केली. रिपब्लिकन मतदार बीजेपीच्या विरोधात आहेत, असलेच पाहिजेत. पण या मतदारांचे नेतृत्व करणारे छोटे-मोठे नेते कार्यकर्ते प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या बीजेपी सोबत आहेत ही चिंतेची बाब आहे. अशावेळी रिपाइं (आंबेडकर) पक्षावर फार मोठी जबाबदारी आहे. बीजेपीच्या विरोधात मतदान करायचे पण कोणाला करायचे हा महत्त्वाचा मुद्दा आहे व हे सांगण्याचे महत्त्वाचे काम रिपाइं (आंबेडकर) पक्षाला करावयाचे आहे. बीजेपीच्या विरोधातील मतदान विखुरल्या गेले तर त्याचा काही उपयोग होणार नाही. बीजेपी विरोधी रिपब्लिकन मतदान एकत्रित पणे इंडिया आघाडीच्या उमेदवाराला गेले तरच बीजेपी विरोधी उमेदवार निवडून येवुन बीजेपी विरोधाचा उपयोग होईल. पण यासाठी इंडिया आघाडीमध्ये रिपाई (आंबेडकर) पक्षाचा सहभाग असणे आवश्यक आहे त्यासाठी पक्षाने लोकसभेच्या दोन जागेची मागणी केलेली आहे. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉक्टर पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे एक तरी लोकसभेची जागा मिळावी असा आग्रह आहे आणि तसे झाले तरच बीजेपीच्या विरोधात मतदान करण्यासाठी मतदारांना सांगणे आम्हाला सोपे होणार आहे.
बीजेपीच्या विरोधात मतदान करणे, इंडिया आघाडीच्या उमेदवाराला एक गठ्ठा मतदान करणे, रिपाइं (आंबेडकर) पक्षाचा एक खासदार लोकसभेत पाठविणे, लोकसभा निवडणुकी दरम्यानच विधानसभेची ही तयारी करणे हे सर्व करताना पक्षाची मजबुत बांधणी करणे, नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाने ब-यापैकी मतदान घेतले. त्याचा उपयोग करून घेत, ह्या पंचसूत्रीची अंमलबजावणी करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आले.
यावेळी प्रामुख्यानेपूर्व विदर्भ अध्यक्ष आर एस वानखेडे, विदर्भ महासचिव भीमराव डोंगरे, विदर्भ पदाधिकारी कृष्णा गवईकर, नागपूर जिल्हा ग्रामीण महासचिव रामदासजी गजभिये, हिंगणा विधानसभा प्रभारी भाई देवेंद्र सिरसाट, उमरेड तालुका अध्यक्ष जयेंद्र महाजन, भिवापूर तालुका अध्यक्ष ईश्वर ढोणे, नागपूर शहर युवा अध्यक्ष अमोल वानखेडे, हरिचंद्र लंगडे, ओम पाटील, विजय लांजेवार, यु एन बोरकर, गुप्तमन्यू मेश्राम, धीरज चंदनखेडे, भरत मेश्राम, दिलीप काळबांडे, गोविंद चंद्रिकापुरे, दीपक डडमल, अरुण मेश्राम इत्यादी उपस्थित होते.

