सुखा दुःखात धावून जाणारे खरे सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांचा दणका.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी;- आलापल्ली सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग 353c अखेर या मार्गाचे कामाला सुरुवात झाली असून या मार्गासाठी एकमेव सामाजिक कार्यकर्ते संतोषभाऊ ताटिकोंडावार यांनी लढा दिला होता अखेर त्यांच्या प्रयत्नात यश आले असून आता प्रवास सुखमय होणार आहे.
सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, आलापल्ली सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग 353c या मार्गाची दयनीय अवस्था झाली होती कित्येक अपघात या मार्गवर झाले होते या मार्गावर प्रवास करणे अवघड झाले होते शाळकरी मुलांपासून तर गरोदर मातांपर्यंत या लोकांना वेदना सहन करावा लागत होते.
ही बाब लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते संतोषभाऊ ताटीकोंडावार यांनी रेपणपल्ली येथे चक्का जाम आंदोलन केले होते तबल आंदोलन हे पाच तास चालले या आंदोलनात आलापल्ली सिरोंचा मार्गावर यातायात ठप्प झाली होती.
पोलीस प्रशासनाला मध्यस्ती करावी लागली संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिले नंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले व अखेर काही दिवसात या कामाला सुरुवात झाली.
लोकांच्या समस्यांसाठी नेहमीच झटणाने सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांचे सर्वच स्तरावरुन कौतुक होत आहे. यावेळी परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहे.

