रविंद्र भदर्गे, जालना उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- जिल्हातील मौजे सावरगाव दु. (संगमेश्वर) व मौजे गोळेगाव ता. परतूर येथील गोदावरी नदीपात्रातून विना परवाना अवैधरित्या रेती उपसा केल्या जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शासनाचा महसूल बुडत असून निसर्गाला हानी पोहचवला जात आहे.
गेल्या दोन महिन्यापासून मौजे सावरगाव बु. (संगमेश्वर) व मौजे गोळेगाव ता. परतूर येथील गोदावरी नदीपात्रातून विना परवाना रेती ऊपसा राजरोजपणे केला जात आहे. सदरील प्रकाराबाबत तहसिलदार परतूर यांना तोंडी कळविले असून सुध्दा त्यांनी कुठल्याही प्रकारे कार्यवाही केलेली नाही. गेल्या दोन महिन्यापासून ते आज पर्यंत मौजे सावरगाव बु. (संगमेश्वर) व गोळेगाव नदीपात्रातील जवळपास दोन कोटी पेक्षा जास्त मालमत्तेची वाळू उपसा केला गेला आहे. तरी सुध्दा प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नसल्याचे दिसून येत आहे.
सदरील प्रकरणात प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष घालून वाळूरिती ऊपसाधारकांवर कार्यवाही करावी व आळा बसविण्यात यावा, अन्यथा वंचित बहुजन आघाडी यांचे वतीने आपल्या कार्यालया समोर तिव्र अंदोलन करण्यात येईल. करीता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देऊन निवेदनावर सह्या रविंद्र भदर्गे परतूर तालुका अध्यक्ष रोहन वाघमारे जिल्हा उपाध्यक्ष गौतम लहाने गौतम मुंढे यांच्या आहेत.

