मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- जन्म दिला आणि त्या तिघी देवाघरी गेल्या. असं एकाच वेळी त्या निष्पाप अनाथ तीन वेगवेगळ्या पिलाच्या बाबतीत घडलं. आणि नियती समोर सारेच नतमस्तक झालेले.आता ह्या नवजात पिलाना जगवायचं कसं हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. कारण त्या नवजात पिलाना आईचंच दूध हवं होत.
मग नेहमी प्रमाणे आठवला तो वन्यजीव रक्षक राकेश झाडें.त्याच्याशी संपर्क त्या त्या पिलाच्या मालकांनी केला. त्याच्या आश्रमात ही तिन्ही अनाथ पिल्लू आली. आता त्यांना जगवायचं कसं? हा यक्ष प्रश्न राकेश समोर आला आणि नियती त्याच्या मदतीला पुन्हा धावून आली.
तशातच एका मायेचे पिलू अचानक देवाघरी निघून गेलं. तिचा पान्हा तसाच दुधाने वाहत होता. मग राकेशने त्या तिन्ही पिलाजवळ त्या आपलं बाळ गमावलेल्या त्या दुःखी मातेला आणलं. तिनेही मोठं मन करत त्या तीनही पिलाना आपल्या अमृताच्या दुग्ध जलधारांनी तृप्त केल ब करत आहे.
हंबरून आपल्या पोटच्या गोळ्याला ममतेने चाटणारी गाय तर बघितली. परंतु स्वतःच्या नसलेल्या पिलाना आपली अमृतधारेने तृप्त करणाऱ्या अनोख्या मातृत्वाचा अनोखा संगम वन्यजीवरक्षक राकेश झाडें या देवदूताच्या अथक परिश्रमानें साकार झाला.

