उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- अशोका फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात येणाऱ्या विक्रिकर निरीक्षक पदावर निवड झाल्याबद्दल पंकज तायडे यांचा शाल व शेफर्ड देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित शेळद बार असोसिएशन अध्यक्ष ॲड. पंजाबराव तिडके, प्राचार्य पंजाबराव भिलंगे सर, अशोका फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष शुभम तिडके, मनीष तायडे, जावेद साहेब, अनुराग तायडे, राज तायडे, अनिकेत तायडे, गौतम सौदेकर, विकास बोरकर इत्यादी उपस्थित होते व यावेळी पंकज तायडे यांना पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

