उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- राज्यात ‘जेएन.1’ व्हेरियंटचे रुग्ण वाढत आहे. यात अकोला येथील एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. अकोल्यात ‘कोरोना’चा सब व्हेरियंट ‘जेएन.1’ चा पहिला रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण अकोला शहरातील असून सद्या त्यांची प्रकृती ठीक असल्याच आरोग्य अधिकारी सांगतात. तर या रुग्णाला बाहेरगावी जाण्यासाठी कोरोना टेस्ट करणे गरजेचे असल्याचं ट्रॅव्हल्स कडून सूचना करण्यात आली होती. त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने. त्याला क्वारंटाईन करण्यात आलं होतं त्यासोबत त्याच्या परिवाराची ही कोरोना टेस्ट केली असून त्यामध्ये सर्वजण निगेटिव्ह आले असून आता हा रुग्ण बरा आहे.
रुग्णाची 5 डिसेंबरला कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती आणि त्यानंतर रुग्णाचे नमुने पुणे येथील सह्याद्री रुग्णालयाकडे पाठवण्यात आले होते. या तपासणीत रुग्णात ‘जेएन.1’ व्हेरियंट विषाणू आढळल्याच्या अहवाल 23 डिसेंबरला प्राप्त झाला आहे. पण रुग्ण हा क्वारंटिन राहल्याने आणि सद्या त्यांची प्रकृती ठीक असून त्यांची कुटुंबामध्ये कोणीही बाधित मिळून आले नाही. सद्या अकोला जिल्ह्यात किंवा शहरात एकही रुग्ण ‘जेएन.1’ व्हेरियंटचा बाधित रुग्ण नसल्याचं महानगर पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अनुप चौधरी यांनी ही माहिती दिली आहे.

