हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा. 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर :- जंगलातून अवैध रेती उत्खणन करून वाहतूक सुरू असल्याची माहिती बल्लारशाह वनपरिक्षेत्र येथील वन कर्मचारी व फिरते पथक यांना मिळाली. त्या वरून दोन ट्रॅक्टर सह ट्रॉली जप्त केले.
२७ डिसेंबर रोजी ला सकाळी ९ वाजताचे सुमारास मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर अंतर्गत बल्लारशाह वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र केम येथील कक्ष क्रमांक ४९५ मधील सरकारी जंगलातुन अवैधरित्या रेती उत्खणन करुन वाहतुक सुरु असल्याबाबत गुप्त माहितीचे आधारे बल्लारपूर येथील नरेश बाबुलाल बहुरीया यांचे मालकीचे ट्रॅक्टर क्रमांक एम एच ३४ ए पी १०४३, एम एच ३४ एल ५८८३ व ट्राली क्रमांक एम एच ३३ २५३०, एम एच ३४ एल ५८८४ जप्त करुन आरोपी विरुध्द भारतीय वनअधिनियम १९२७ चे कलम २६(१) ड (ग), ५२ दिनांक २७/१२/२०२३ अन्वये प्राथमिक वनगुन्हा क्रमांक १३/८ जारी करुन दोन ट्रॅक्टर व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. वनपरिक्षेत्र बल्हारशाह व फिरते पथक बल्हारशाह यांचे संयुक्त गस्ती दरम्यान सदरची कार्यवाही करण्यात आली.

जप्त करण्यात आलेल्या दोन्ही ट्रॅक्टर व मुद्देमाल वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, बल्हारशाह येथे ठेवण्यात आलेले असुन सदर प्रकरणाचा पुढील तपास मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर चे उपवनसंरक्षक, श्रीमती, स्वेता बोड्डु, सहाय्यक वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह नरेश भोवरे व क्षेत्र सहाय्यक, बल्हारशाह कोमल घुगलोत हे करीत आहेत. सदर कार्यवाही यशस्वी करण्याकरीता फिरते पथक, बल्हारशाह ने कर्मचारी वनपाल चापले, सिरपुरकर, वनरक्षक शील व बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील वनरक्षक सुधीर बोकडे व उषा घोडवे यांनी सहकार्य केले.

