संतोष मेश्राम, राजुरा प्रतिनिधी
मो न 9923497800
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाकडे गेल्या चार दशकापासून ग्रामीण व शहरी भागामध्ये अंगणवाडी कार्यकर्ती अंगणवाडी मदतनीस यांच्या मदतीने शासनाचे आलेख उपक्रम महिला बालकल्याण व आरोग्याचे ग्रामीण पातळीपर्यंत शेवटच्या घटकाला लाभ व त्यांच्या समस्या आरोग्य विषयक काळजी घेण्याचे काम ग्रामीण पातळीवर नाममात्र मानधनावर सुरू करण्यात आली होती त्यावेळेस एन आर इ पी योजनेतून काही ठिकाणी इमारती उभ्या करून तर काही ठिकाणी शासकीय किंवा खाजगी रूम पाहून त्या ठिकाणी महिला बालकल्याण चा कार्यक्रम नाममात्र मानधनावर करण्यात आला वाढती महागाई अवाढव्य वाढलेला खर्च यामुळे शेतमजुराला देखील शेतीमध्ये काम करण्याची इच्छा नाही अशा अवस्थेत महिला बाल कल्याण विभागामध्ये कार्यरत असलेले अनेक कर्मचारी कोरोना सारख्या आजारामध्ये देखील कार्यरत होते.
शासनाने गेल्या पंचवीस दिवसापासून सुरू असलेल्या अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे राज्यव्यापी आंदोलन ग्रामीण भागातील कार्य सर्व ठप्प पडले असून शासनाने तातडीने दखल घेऊन तोडगा काढावा व ग्रामीण भागातील शालेय पोषण आहार गरोदर माता व झिरो ते सहा वयोगटातील बालकांचे तसेच कुपोषित बालकांची काळजी घेण्याच्या दृष्टीने अंगणवाडी कार्यकर्ते संघटनेच्या मागणीचा विचार करून सुरू असलेले आंदोलन संपवण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर योग्य निर्णय व्हावा यासाठी गेल्या२५ दिवसा पासून सुरू असलेल्या अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे राज्यव्यापी आंदोलनाला पूर्ण विराम शासणाने दाखल घ्यावी तोडगा काढावा.

