Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

तरुणीची छेड काढत अश्लील चाळे करणाऱ्या आरोपीला संतप्त पालक तसेच नागरिकांनी अंगावरील कपडे फाटेपर्यंत दिला चोप.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 30, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
तरुणीची छेड काढत अश्लील चाळे करणाऱ्या आरोपीला संतप्त पालक तसेच नागरिकांनी अंगावरील कपडे फाटेपर्यंत दिला चोप.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा. 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील सिंदी (रेल्वे) येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथे एक मुलगा एक महिन्यांपासून येथील केसरीमल नगर विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीची छेड काढत अश्लील चाळे करणाऱ्या आरोपीला संतप्त पालक तसेच नागरिकांनी अंगावरील कपडे फाटेपर्यंत चांगलाच चाप दिला. त्यानंतर आरोपीची शहरात धिंड काढत पालकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रीतम सहारे वय 32 वर्ष असे आरोपीचे नाव असून पळसगाव रोड बेगरवस्ती सिंदी (रेल्वे) येथे मागील सात वर्षांपासून राहत असल्याचे सांगितले जाते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून जखमी आरोपीला वर्धेच्या इस्पितळात दाखल केले आहे.

प्राप्त माहितीनुसार येथील केसरीमल नगर विद्यालयाच्या बाजूला असलेल्या माता मंदिरा जवळ मागील एक महिन्यांपासून आरोपी प्रीतम सहारे हा सकाळी 6 ते 7.30 वाजताच्या सुमारास रोज शाळेत येणाऱ्या जाणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीची छेड काढत त्यांना अश्लील चाळे करून पळ काढायचा. याबाबत या विद्यार्थिनींनी शाळेच्या शिक्षकांना तसेच घरी आपल्या पालकांना ही बाब सांगितली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता शाळेचे मुख्याध्यापक विलास येखंडे, शाळेचे शिक्षक तसेच पालक 27 डिसेंबर रोजी सिंदी पोलिसात फिर्याद देण्यासाठी गेले. परंतु, कर्त्याव्यवर असलेले पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेतली नाही.

सिंदी पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह: 27 डिसेंबर रोजी सकाळी आरोपी प्रीतम सहारे याने रस्त्यात मुलीला आडवा होऊन छेड काढली. याप्रकरणी मुलींच्या पालकांनी व शिक्षकांनी सिंदी पोलिसात तक्रार देण्यासाठी गेले. मात्र, पोलिसांनी तक्रार दाखल केली नाही. शिवाय, त्या घटनेची साधी चौकशी सुद्धा केली नाही. आम्ही पोलिसांची गाडी पाठवून शाळेच्या परिसरात पेट्रोलिंग करतो, असे पोलिस शिपाई प्रशांत श्रीवास्तव यांनी पालकांना सांगून परत केले. मात्र, कोणताही पोलिस पेट्रोलिंगसाठी आला नसल्याचे
केसरीमल नगर विद्यालयाचे शिक्षक अमोल गवळी व पालक गजानन घोडे यांनी बोलतांना सांगितले. मागील एक महिन्यापासून आरोपी मुलींची छेड काढत होता. त्यामुळे मुलींमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी घटनेची दखल घेतली नसल्याने सरतेशेवटी पालकानांच कायदा हातात घेत आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करावे लागल्याने स्थानिक पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याच्या प्रतिक्रिया सप्त पालकांकडून बोलल्या जात आहे.

Previous Post

अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांना देण्यात येणाऱ्या अन्नामध्ये आढळल्या जिवंत अळ्या, रुग्णाच्या जीवाशी खेळ.

Next Post

पत्रकार हाजी मोहम्मद रफिक यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा, शहरातील मान्यवरांसह अनेक नागरिकांची उपस्थिती.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पत्रकार हाजी मोहम्मद रफिक यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा, शहरातील मान्यवरांसह अनेक नागरिकांची उपस्थिती.

पत्रकार हाजी मोहम्मद रफिक यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा, शहरातील मान्यवरांसह अनेक नागरिकांची उपस्थिती.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In