सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी संवर्ग विकास अधिकारी यांना निवेदनद्वारे केली आहे
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्हातील अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या राजाराम ग्रामपंचायत येते विकास कामात मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार सुरू असल्याचे दिसून येते आहे. जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप गावकऱ्यांनी करत दिनांक 02 जानेवारी गावात सुरू असलेल्या भष्ट्राचाराबाबत गटविकास अधिकारी पंचायत समिती अहेरी यांना निवेदन द्वारे कळविण्यात आले.
राजाराम येथील जल जीवन मिशन अंतर्गत झालेला काम पाण्याची टाकी व नळ जोडणीची काम अपूर्ण झाले असून, या कामाचा नाहरकत प्रमाणपत्र ग्रामसभा व नागरिकांना विश्वासात न घेता तत्कालीन ग्रामसेवक व प्रशासक यांनी नाहरकत प्रमाणपत्र सबंधीत ठेकेदारांना देण्यात आले आहे. त्या करीता समस्त गावकरी, ग्रामसभा या विषयावर आक्षेप घेत असून यांची योग्य ती चौकशी करून कारवाई करावी व पुढील ग्रामसभेत सबंधीत ठेकेदार, ग्रामसेवक व प्रशासक उपस्थित रहावे,असे निवेदन द्वारे देण्यात आले.
यावेळी नवनिर्वाचित सरपंचा ,मंगलाताई आत्राम उपसरपंच,रोशन कंबागौनीवार विनायक आलाम, रमेश पोरतेट, संजावली अरगेला, यशोदा आत्राम, पुजा सोयाम, सुशीला सोयाम, प्रतिष्टीत नागरिक अरविंद परकीवार, दिवाकर आत्राम अनिता आलाम ग्राम पंचायत सदस्य व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

