पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, श्री. विनय कुमार चौबे यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवुन शरिराविरुध्दचे व मालाविरुध्दचे गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले होते. मा. पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२३ मध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रातील ५१ संघटीत गुन्हेगारी टोळ्यांमधील एकुण ३५७ आरोपींवर मोका कायदयातर्गत कारवाई करण्यात आलेली असुन सांगवी पो.स्टे. गुरनं-५८२/२०२३, गुरनं-५४७/२०२, गुरनं ६३१/२०२३ प्रमाणे या तिन्ही गुन्हयातील भादंवि कलम ३९२, ४११, ३४ मधील चैन चोरी गुन्हयातील अप्रामाणिकपणे चोरीची मालमत्ता स्विकारणाऱ्या ३ सराफांवर १) दर्शन रमेश पारेख वय ३२ वर्षे रा. निता कॉर्नर, खडकी पुणे २) गणपत जवाहरलाल शर्मा वय ४४ वर्षे रा. मांगल्य सोसा. एलफिस्टन रोड, खडकी पुणे. ३) सुरजभान सिध्दराम अगरवाल वय ७८ वर्षे रा.श्री गणेश ज्वेलर्स जवळ, खडकी पुणे. यांचेवर मोका अतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.
१) वाकड पो.स्टे गुरनं ९९८/२०२३ भादंवि. ३९५, ३२३, ५०६ (२), ४२७, आर्म अॅक्ट ४, (२५) म.पो.का. कलम ३७ (१) (३) १३५ सह, क्रिमी.ली. अंमें. अॅक्ट ३ व ७ या गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी रोहन ऊर्फ गंग्या वासुदेव वाघमारे (टोळी प्रमुख) वय-२८ वर्ष, रा. चौधरी पार्क, वाकड पुणे २) चाकण पो.स्टे. गुरनं ७५५/२०२३ भादंवि. ३९५, ३६४ (अ), ३८७, १२० ब, या गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी शुभम युवराज सरोदे (टोळी प्रमुख) बय २१ वर्षे, रा. नाणेकरवाडी, चाकण ता.खेड जि. पुणे. ३) निगडी पो.स्टे. गुरनं-५८८/२०२३ भादंबि. २०२, ३०७, ३२६, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, आर्म अॅक्ट ४(२५), महा. पो.का. कलम. ३७ (१) (३)१३५ या गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी- मोहम्मद ऊर्फ मध्या मेहबुब कोरबु (टोळी प्रमुख) वय २८ वर्षे, रा. आझाद चौक, उरवेला होसींग सोसा.बि.नं.५/२०३, ओटास्कीम, निगडी पुणे व इतर साथीदार ४) पिंपरी पो.स्टे. गुरनं १११२/२०२३ भादंवि. ३०७, ३२३, ५०६, ३४ आर्म अॅक्ट कलम. ४ (२५), ४ (२७), महा.पो.का. कलम. ३७ (१) (३) सह १३५, क्रि.लॉ.अॅ. अॅक्ट, कलम. ३ व ७ या गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी नामे प्रकाश ऊर्फ डब्बल सुरेंद्र राम (टोळी प्रमुख) वय-३० वर्ष, रा. हनुमान जिमचे जवळ, १६ नंबर बिल्डींगचे मागे, बौध्द नगर, पिंपरी पुणे ५) पिंपरी पो.स्टे. गुरनं-१११३/२०२३ भादंवि. ३८६, ३८७, ५०४, ५०६, २१२, ३४, आर्म अॅक्ट ४ (२५), महा.पो.का. ३७ (१) (३) सह १३५, क्रि. लॉ. अँ. अॅक्ट कलम ७ या गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी आकाश ऊर्फ जिलब्या यादव गायकवाड (टोळी प्रमुख) वय २६ वर्षे, रा. महात्मा फुले नगर, चिंचवड, पुणे ६) सांगवी पो.स्टे. गुरनं-५८२/२०२३ भादंवि ३९२, ३४, ४११ या गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी आनंद सुनिल साळुंके उर्फ लोहार (टोळी प्रमुख) वय-१९ वर्षे रा. कमीला चाळ, महादेवनगर, खडकी, पुणे, ७) निगडी पो.स्टे. गुरनं -६५७/२०२३ भादंवि ३९२,४१४, ३४ या गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी- लखन ऊर्फ बबलू अवधुत शर्मा (टोळी प्रमुख) वय १९ वर्षे, रा. पांढारकर चाळ, दळवीनगर, चिंचवड पुणे ८) भोसरी पो.स्टे. गुरनं- १०२/२०२३ भादंवि ३८७,३८५,५०४, ५०६,३४ या गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी अक्षय नंदकिशोर गवळी (टोळी प्रमुख) वय २८ वर्षे, रा. ४१९, गवळी वाडा, खडकी पुणे ९) सांगवी पो.स्टे. गुरनं- ५४७/२०२३ भादवि ३९२, ३४, ४११ या गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी-आनंद सुनिल साळुंके उर्फ लोहार (टोळी प्रमुख) बय-१९ वर्ष रा. कमीला चाळ, महादेवनगर, खडकी, पुणे, १०) सांगवी पो.स्टे. गुरनं ५६१/२०२३ भादंवि कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९, ५०६ (२), आर्म अॅक्ट ४ (२५) (२७), महा.पो.का. कलम ३७ (१) (३) सह १३५, क्रि.लो. अमे. अॅक्ट कलम ७ या गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी- अक्षय ऊर्फ जोग्या हेमंत जाधव (टोळी प्रमुख) वय २५ वर्षे, रा. बाबुराव ढोरे भवन समोर, जुनी सांगवी, पुणे ११) चिखली पो.स्टे गुरनं ७४०/२०२३ भादवि. ३९५, ३९७, ५०४, ५०६, ४२७ या गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी मन्न ऊर्फ अतिष बलदेव कोरी (टोळी प्रमुख वय २१ वर्षे, रा. गोकुळधाम सोसा, घरकुल चिखली, पुणे) १२) सांगवी पो.स्टे. गुरनं ६३१/२०२३ भादंवि कलम ३९२, ४११, ३४ या गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी- आनंद सुनिल साळुंके उर्फ लोहार (टोळी प्रमुख) वय-१९ वर्षे रा. कमीला चाळ, महादेवनगर, खडकी, पुणे, वरिल सर्व टोळी प्रमुख व त्यांचे साथीदार यांच्यावर गंभीर गुन्हे नोंद केल्याची आढळून आलेली आहे.
वरिल १२ टोळी प्रमुख यांनी त्यांचे साथीदारासह अन्य सदस्यांसाठी प्रत्येक गुन्हयात काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवुन स्वतःची संघटीत टोळी तयार करुन अबैध मागांने आर्थिक फायदा मिळवण्याचे उद्देशाने स्वतःचे गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी संघटित गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख म्हणुन किंवा संघटनेच्या वतीने एकटयाने किवा संयुक्तपणे, हिंसाचाराचा वापर करुन अथवा हिंसाचाराची धमकी देवुन किवा धाक दपटशहा दाखवुन टोळी प्रमुख व साथीदार यांनी खून, खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न करणे, दरोडा, जबरी चोरी, अप्रमाणिकपणे चोरीची मालमत्ता स्विकारणे, तोडफोड करणे, विनयभंग, अपहरण, खंडणी, दरोडा, दंगा करणे, अश्लिल वर्तन करणे, जिवे ठार मारण्याची धमकी देणे, बेकायदेशीररित्या घातक शस्त्रे जवळ बाळगणे असे अनेक गंभीर गुन्हे अशा प्रकारेचे गंभीरे स्वरुपाचे चढत्या क्रमाने गुन्हे दाखल आहेत. प्रत्येक गुन्हा करताना त्यांनी वैयक्तिक व टोळीचे वर्चस्व वाढावे व आर्थिक फायदा व्हावा तसेच जनमानसात दहशत रहावी हाच उद्देश ठेवुन टोळी प्रमुखांनी गुन्हे केलेले आहेत.
सदर टोळीमधील सर्व आरोपी यांनी संघटीत गुन्हेगारी टोळी बनवुन हिंसाचाराचा वापर करुन वर्चस्वासाठी व आर्थिक फायदयासाठी संघटीतपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे विरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ अतंर्गत कारवाई करणे बाबत प्रस्ताव पोलीस आयुक्त कार्यालय येथे सादर केला असता सदर प्रस्तावा मधील कागदपत्रांची छाननी करुन नमुद गुन्ह्यांत महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३ (४) या कलमांचा अंतर्भाव करण्याचे आदेश मा. श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी पारीत केलेले आहे.
सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चोबे, मा. पोलीस सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, मा. अपर पोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी, मा. पोलीस उप-आयुक्त (परि-०१) श्री. विवेक पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त (परि-०२) श्री. काकासाहेब डोळे, मा. पोलीस उप-आयुक्त (परि-०३) श्री. संदिप डोईफाडे मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे मॅडम, मा. सपोआ श्री. सतिश माने, मा. सपोआ श्री. बाळासाहेब कोपनर मा.सपोआ डॉ. विशाल हिरे, मा. सपोआ डॉ. विवेक मुंगळीकर, मा. सपोभा राजेंद्र गौर, मा.सपोआ विठ्ठल कुबडे यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि गणेश जवादवाड, वपोनि, रणजित सावंत, वपोनि ज्ञारेश्वर काटकर, वपोनि शिवाजी गवारे, वपोनि अशोक कदम, वपोनि रामचंद्र घाडगे, वपोनि राम राजमाने, पोनि संतोष पाटील, पोनि बाळकृष्ण सावंत, पोलीस अंमलदार पोहवा सचिन चव्हाण, पोहवा व्यंकप्पा कारभारी यांनी केली आहे.

