संतोष मेश्राम, राजुरा प्रतिनिधी
मो न 9923497800
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर :- राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्रचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तसेच प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे तसेच ओबीसी प्रदेश अध्यक्ष कल्याण आखाडे, ओबीसी समन्वयक ईश्वर बाळबुद्धे, माजी खासदार आनंद परांजपे, पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, वैभव आखाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस नितीन भटारकर यांच्या मार्गदर्शनात मुंबई येथील देवगिरी उपमुख्यमंत्री निवास्थानी अविनाश आनंदराव राऊत यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाच्या चंद्रपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
अविनाश आनंदराव राऊत यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाच्या चंद्रपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांनी सांगितले की, या माध्यमातून ओबीसी जनतेला न्याय देण्याची भूमिका मनात ठेवूनच काम करणार, पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्नरत असणार, शिव शाहू फुले आंबेडकरी विचारधारा जोपासूनच “जागर संविधानाचा ओबीसीच्या न्याय हक्काचा” लढा उभारण्यासाठी अविरत तत्पर असणार या निमित्ताने अशी ग्वाही त्यांनी दिली.सर्व मान्यवर नेत्यांचे, सर्वच सहकाऱ्यांचे जाहीर आभार आभार सुद्धा व्यक्त केले. वेळोवेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यामुळेच काम करण्याची ऊर्जा प्रदान होते आता ही ऊर्जा दादांच्या नेतृत्वात आणखीनच द्विगुणित होणार आहे असेही त्यांनी सांगितले.
सदर निवडीबद्दल दामोदरजी मिसार जेष्ठ नेते रांकापा, नितीन भटारकर जिल्हाध्यक्ष रांकापा, राजीव कक्कड जिल्हाध्यक्ष चंद्रपूर सह अनेक कार्यकर्ते यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

