Thursday, March 5, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपुरात झाला विश्वविक्रम! विष्णू मनोहर यांनी बनवली 7000 किलो पेक्षा अधिक खिचडी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 6, 2024
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपुरात झाला विश्वविक्रम! विष्णू मनोहर यांनी बनवली 7000 किलो पेक्षा अधिक खिचडी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

शिस्तबद्ध आयोजन व वाटप व्यवस्थेचे सर्वत्र कौतुक.

हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा.9764268694

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर, दि.5:- आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी चंद्रपुरात आज (दि.5) 7 हजार किलोपेक्षा जास्त तृणधान्यांची खिचडी बनवून विश्वविक्रम नोंदविला. राज्याचे वन, सांस्कृतिक आणि मत्स्यव्यवसाय मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपूर येथील चांदा क्लब ग्राउंड येथे सुरू कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार साजरे करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय मिलेट वर्षानिमित्त विष्णू मनोहर यांनी चंद्रपूर येथे मिलेट खिचडी बनवून संपूर्ण जगाला “मिलेट” चे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

5 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजता विक्रमी खिचडी बनविण्यास सुरुवात करण्यात आली. 6750 किलो खिचडी बनविण्याचा संकल्प विष्णू मनोहर यांनी केला होता. ही खिचडी बनवण्याची पद्धत रेसिपी आणि मोठमोठ्या कढयांमधून टाकण्यात येणारे पदार्थ याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. चंद्रपूर येथे करण्यात आलेला विक्रम महाराष्ट्रातील बळीराजाला समर्पित करण्याचा निर्धार यावेळी विष्णू मनोहर यांनी व्यक्त केला व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही संधी दिल्याबद्दल त्यांचे आभारही मानले.

राज्याचे कृषी विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांच्या हस्ते विष्णू मनोहर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जॉन्सन, महानगरपालिकेचे आयुक्त विपिन पालीवाल, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, आत्म्याच्या प्रकल्प अधिकारी प्रीती हिरळकर, राहुल पावडे, प्रकाश धारणे उपस्थित होते.

खिचडीचे शिस्तबद्ध वाटप : 7000 किलो पेक्षा जास्त झालेली ही खिचडी याचे वाटप कसे करावे हा प्रश्न सर्वांनाच उत्सुकतेपटी पडलेला होता. परंतु जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जॉन्सन आणि चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त विपिन पालीवाल यांनी संपूर्ण यंत्रणा शिस्तबद्ध रीतीने कामाला लावून ही खिचडी शाळांमध्ये तसेच शहरातील वस्त्यांमध्ये वाटण्याची व्यवस्था केली. कृषी प्रदर्शनाच्यास्थळी विविध स्टॉलवर असलेल्या प्रत्येक माणसाला ही खिचडी देण्यात आली. शहरातील 35 हजार लोकांपर्यंत ही खिचडी पोहोचेल, अशी व्यवस्था पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली होती.

पालकमंत्र्यांनी मानले विष्णु मनोहर यांचे आभार : पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे नागपूरला असल्याने त्यांनी फोनवरून विष्णू मनोहर यांना शुभेच्छा दिल्या आणि चंद्रपुरात हा विश्वविक्रम केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023 हे वर्ष ‘मि‍लेट वर्ष’ म्‍हणून घोषित केल्‍यानंतर विष्‍णू मनोहर यांनी मिलेटच्‍या प्रचार व प्रसारासाठी वर्षभर वेगवेगळ्या शहरात 12 मिलेटचे पदार्थ तयार करण्‍याचा निर्धार केला होता. त्‍यानुसार आतापर्यंत नागपूर, औरंगाबाद व नाशिक येथे त्‍यांनी मिलेटचे विविध पदार्थ तयार केले आहेत. चांदा एग्रोमध्‍ये विष्‍णू मनोहर शुक्रवारी बाजरी हे मिलेट धान्‍य व सर्व भाज्‍यांचा वापर करून पुर्णान्‍न असलेली खिचडी तयार केली. त्‍यासाठी 10 फूट व्‍यासाची, 5 फूट उंचीची कढई आणि सुमारे 500 किलो लाकूड वापरण्यात आले.

Previous Post

हिंगणघाट येथील शहालंगडी मध्ये पतांजलिचा पुढाकाराने राबविण्यात आले स्वच्छता अभियान.

Next Post

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In