मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- पत्रकार दिनानिमित्त ०६ जानेवारी २०२४ रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची संपूर्ण महाराष्ट्र राज्यात यांची जयंती उत्साहात साजरी केली जाते. सहा जानेवारी हा पञकार दिन असुन महाराष्ट्रा मध्ये पहिले मराठी वृत्तपञ दर्पण म्हणून आचार्य बाळशास्ञी जांभेकर यांनी सुरू केले व लोकांना स्वातंञ व हक्क आधिकाराकरिता जन जागृती करण्याचे कार्य हाती घेतले असे संघटनेचे कोषाध्यक्ष अशोक खंडारे आपल्या मनोगतात म्हणाले.
त्याच प्रमाणे यंदा ही आलापल्ली येथील शासकीय विश्रामगृह येथे युवा पञकार संघटनेतील सदस्या तर्फे गडचिरोली जिल्हा तर्फे पञकार दिननिमित्त आचार्य बाळशास्ञी जांभेकर यांच्या प्रतिमेस भास्कर फरकडे गडचिरोली वार्ता न्युज पोर्टलचे संपादक यांच्या हस्ते माल्यर्पण करण्यात आले असुन संघटनेचे पदाधिकारी तथा युवा ग्रामीण पञकार संघटनेचे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष मधुकर गोंगले. यांचे हस्ते पुजन करुन मानवंदना देण्यात आली.
यावेळी विविध विषयांवर चर्चा करून अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालय येथे मधुकर गोंगले युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष यांचा स्वखर्चातुन रुग्णांना फळ वाटप करण्याचे आयोजन करून फळवाटप करण्यात आले.
यावेळी अशोक खंडारे वैनगंगा वार्ता न्युज संपादक, सुरेश मोतकुरवार दस्तक न्युज संपादक, भास्कर फरकडे संपादक गडचिरोली वार्ता न्युज, अक्षय गोंगले उपसंपादक गडचिरोली वार्ता न्युज, मधूकर गोंगले गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधी, उमेश गझल्लपल्लीवार विदर्भ न्यूज एक्स्प्रेस प्रतिनिधी, फुलचंद वाघाडे वैभव पुणे दैनिक प्रतिनिधी गडचिरोली, राकेश तेलकुंटलवार गडचिरोली वार्ता न्युज प्रतिनिधी एटापल्ली, किशोर उसेंडी गोंडवाना शक्ती न्युज संपादक, श्रावण वाकोडे वैनगंगा वार्ता न्युज 24 संपादक, श्रीनिवास बंडमवार, मारोती कांबळे, तेजस गुजल्लवार, रोशन नरुले, यावेळी मोठया प्रमाणात जिल्हातील पत्रकार उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 7385445348

