संतोष मेश्राम, राजुरा प्रतिनिधी
मोबा. न 9923497800
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे काही अज्ञात दरोडेखोरानी एका पेट्रोल पंपवर बंदुकीच्या धाकावर दरोडा टाकून रोख रक्कम लोटून नेल्याच्या घटनेने संपूर्ण तालुका हादरला आहे.
राजुरा वरुर रोडवर असलेल्या राजुरा शहरापासून 10 किलोमीटर अंतरावरील दिनबाग तांडा यांच्या मालकीचे साईकृपा पेट्रोल पंप आहे. येथे दिनांक 6 जानेवारीला पहाटे तीनच्या सुमारास अज्ञात आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवून एक लाख 90 हजार रुपये पडल्याची घटना वीरूर पोलीस स्टेशन हद्दीत घडली. यामध्ये पेट्रोल पंपावर राखणदार करणारा दोन व्यक्तींना धाक दाखवून कपाटातील रोख रक्कम पळविले. या घटनेची माहिती होतास पोलीस विभागाने नाकाबंदी केली मात्र आरोपी अजूनही गवसले नाहीत या घटनेमुळे प्रचंड दहशत निर्माण झालेली आहे.
राजुरा वरुड रोडवर साईकृपा पेट्रोल पंप आहे .या पेट्रोल पंपावर दिनांक 6 जानेवारीला पहाटे तीन च्या सुमारास अज्ञात पाच व्यक्तीने बंदुकीचा धाक दाखवून तेथील पेट्रोल पंप राखणदारांकडून चाबी हिसकावून रक्कम पळविली यानंतर पेट्रोल पंप च्या मॅनेजरने पोलीस स्टेशनला माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झालेत व आरोपींचा शोध घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली. मात्र अजून पर्यंत आरोपी सापडलेले नाहीत.
या दरोडेखोरांच्या फोटो सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाले असून त्या आधारावर पाच आरोपी यामध्ये सहभागी असल्याची माहिती पोलिसांनी दिले. तोंडाला पट्टे बांधून, हातात शस्त्र घेऊन असलेले हे पाच आरोपी पहाटेच्या सुमारास पेट्रोल पंपावरील रूममध्ये घुसले आणि शस्त्राच्या धाकावर रोख रक्कम पळविले हे सर्व आरोपी 25 ते 35 वर्ष वयोगटातील असावे असा अंदाज आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉक्टर परदेशी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रीना जनबंधू उपविभागी पोलीस अधिकारी दीपक साखरे, राजुरा येथील पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, महेश कोंडावार, निर्मल जयप्रकाश यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपास सुर आहे

