राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधी
मो नंबर 9518368177
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- राजे धर्मराव हाईस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय भंगाराम तळोधी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले यांची जयंती व बालिका दिनानिमित्त छात्रवीर राजे संभाजी प्रशासकीय सेवा महाविद्यालय, मोरवा येथे कार्यरत असलेले डाॅ.दिलीप चौधरी यांनी विद्यार्थ्यांना करिअर गाईडन्सवर मार्गदर्शन केले.तसेच ॲड मंगेश काळे यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले. यावेळी सर्व मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळेस मंचावर मा.जि.प.सदस्य सौ वैष्णवीताई अमर बोडलावार ,ॲड मंगेश काळे, शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक रमण पडीशालवारसर, कूंदाताई पित्तूलवार, उरकूडे मॅडम, धर्मराव शाळेचे माजी विद्यार्थ्यांसह, महाविद्यालयीन विद्यार्थी व शाळेचे शिक्षक वृंद, कर्मचारी उपस्थित होते.

