Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

वर्धा पोलिसांचा ई-दरबार उपक्रम पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा: वने, सांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 8, 2024
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
वर्धा पोलिसांचा ई-दरबार उपक्रम पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा: वने, सांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पोलिस प्रदर्शनीचा समारोप व ई-दरबारचा शुभारंभ

प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो . 9284981757

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन वर्धा, दि.8:- पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या समस्या, अडचणी कालमर्यादेत आणि विनात्रासाने सोडविण्यासाठी वर्धा पोलिसांनी सुरु केलेला ई-दरबार हा अतिशय चांगला उपक्रम आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांना याद्वारे दिलासा मिळेल, असे प्रतिपादन वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

महाराष्ट्र पोलिस दलाच्या वर्धापन दिनानिमित्त पोलिस मुख्यालयाच्या प्रांगणात दोन दिवशीय प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनीचा समारोप व ई-दरबारचा शुभारंभ पालकमंत्री श्री.मुनगंटीवार यांच्याहस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खा.रामदास तडस, आ.रामदास आंबटकर, आ.दादाराव केचे, आ.डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलिस अधीक्षक नुरूल हसन, अपर पोलिस अधीक्षक डॉ.सागर कवडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बदलत्या काळात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी फक्त पोलिस विभागाने काम करुन चालणार नाही तर यामध्ये सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. पोलिस विभागामध्ये सकारात्मक बदल घडून येत आहे. प्रदर्शनीमधील विविध स्टॉलच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती होणार आहे. व्यसनाधिनतेला आळा बसण्यासाठी ही प्रदर्शनी उपयुक्त ठरणार असल्याचे पुढे बोलतांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपली कामे तसेच समस्या मांडण्यासाठी मुख्यालयी यावे लागतात. ई-दरबारच्या माध्यमातून मुख्यालयी न जाता प्रश्न मार्गी लागत आहे. पोलिस अधीक्षक नुरूल हसन यांच्या संकल्पनेतून ई-दरबार हा अतिशय चांगला उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. यासाठी पालकमंत्र्यांनी पोलिस प्रशासनाचे अभिनंदन केले. यावेळी ई-दरबार माहिती पुस्तिकेचेही विमोचन करण्यात आले.
वर्धा पोलिसांच्यावतीने सायबर सुरक्षा, समाज माध्यमांचा सुरक्षित वापर यासह विविध बाबींची नागरिकांना माहिती व्हावी याकरीता प्रदर्शन लावण्यात आले होते.

या प्रदर्शनीमध्ये पोलिसांचा सायबर विभाग, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, गृहरक्षक दल, अंमली पदार्थ विरोधी पथक, दामिनी पथक, वाहतूक विभाग, शस्त्र प्रदर्शनी, डॉग स्कॉड, भरोसा सेल, बिनतारी संदेश विभाग, बॉम्ब शोधक नाशक पथक यांच्यासह विविध दालने लावण्यात आली होती. यावेळी मान्यवरांनी विविध स्टॉलला भेट दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलिस अधीक्षक नुरूल हसन यांनी केले. संचलन व आभार प्रदर्शन स्मिता महाजन यांनी केले.

Previous Post

शिवराज्यभिषेक निमित्त प्रत्येक तालुक्यात अद्यावत व्यायाम शाळा निर्माण करा, पालकमंत्र्याचे जिल्हा नियोजन समितीची बैठकित प्रतिपादन.

Next Post

अखेर संविधान चौक आजनसरा चौफुली येथे पांढरे पट्टे मारून ब्रेकर लावण्याच्या गूरूदयाल सिंग जूनी यांच्या मागणीला यश.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अखेर संविधान चौक आजनसरा चौफुली येथे पांढरे पट्टे मारून ब्रेकर लावण्याच्या गूरूदयाल सिंग जूनी यांच्या मागणीला यश.

अखेर संविधान चौक आजनसरा चौफुली येथे पांढरे पट्टे मारून ब्रेकर लावण्याच्या गूरूदयाल सिंग जूनी यांच्या मागणीला यश.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In